देवनागरी
Roman
Press F12 to toggle

समाजकंटक ब्लॉग्ज वर बहिष्कार

प्रिय ऍडमिन,

UNIDTUNODIS नावाचा एक नवीन ब्लॉग काल-परवा पासून उदयाला आला आहे. हा ब्लॉग एखाद्या हिंदू अतिरेक्याने चालविल्यासारखा विखारी आहे. काही पोस्ट्स पहा, अल्पसंख्यांकांविरोधात संघटित होण्यासाठी, आणि सशस्त्र लढा देण्यासाठी प्रशिक्षण देऊ म्हणे, आणि संपर्कासाठी वेगवेगळ्या गावांतील मोबाईल फ़ोन नंबरही दिले आहेत.

मी स्वत: हिंदू आहे, आणि हलकासा भाजपा+संघ विचारसरणीला पाठिंबा देणारा आहे. हे आवर्जून यासाठी लिहीलं की मी UNIDTUNODIS बद्दल तक्रार करत असलेलो पाहून माझ्यावर मी मार्क्सवादी असल्याचे आरोप होवू नयेत म्हणून..

तर हा नवीन ब्लॉग समाजहिताच्या दॄष्टीने अतिशय घातक वाटतो. आपण जर आपल्या शॄंखलेतून त्याला वगळले तर समाजाचा फ़ायदाच होईल. आणि प्रसिद्धी न मिळाल्याने तो ब्लॉग अस्तित्त्वात असल्याची फ़ारशी दखल घेतली जाणार नाही.

अनवधानाने आणि लोकशाही आहे म्हणून बिचकून आपण अपप्रवॄत्तींना थारा आणि मूक पाठिंबा देणे योग्य नाही, असे प्रामाणिकपणे वाटते.

आपला,
राजेश टिपणीस.

हा ब्लॉग काढून टाकण्याबद्दल असहमती

आपल्याला न पटणारे विचार येउच देउ नये ही भुमिका बौद्धिक दंडेलशाहीची ठरेल. त्यापेक्षा त्याचा वैचारिक प्रतिवाद करणे हे विवेकी.

स्वस्तिक राणे

त्याचा वैचारिक प्रतिवाद करणे

मी पण हा ब्लॉग पाहिला आहे. चालकाचे नाव दिलेले नाही. वैचारीक प्रतिवाद जरुर व्हावा पण तो कोणाशी करायचा आहे याचाच पत्ता नाही.

अन्नुल्लेखाने मारणे अधिक योग्य होइल.

अन्नुल्लेखाने मारणे अधिक योग्य होइल. बंदी घालून काय उपयोग ? असा ब्लॉग पुन्हा पुन्हा येउ शकतोच.

rajesh shi sahamat

pradeep,

rajesh che tech mhanane ahe.

shrunkhaletun kadhun takane mhanajech anullekhane marane.. apan kahi to blog delete karat nahiye, kimwa tyavar navya nondi prakashit hone thambavat nahiye.

rajesh chi vinanti ahe ki tya nondinna apan prasiddhi dene thambavave.

yavar apalya sarvanchi sahamati zaleli disate.

manasi.

समाजकंटक ब्लॉग्ज वर बहिष्कार

आपल्याला न पटनारे विचार दडपुन टाकनणारै हुकुमशाहि मान्य नाहि. त्याना विचारानेच पराभुत करा.
मात्र कुराडिचा दान्डा बनु नका.