देवनागरी
Roman
Press F12 to toggle

प्रासंगिक

डेनवर चा ऐतिहासिक सोहळा शुक्रवार, २९ ऑगस्ट २००८, १६:३६ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

डेनवर चा ऐतिहासिक सोहळा
गुरुवार २८ ऑगस्ट २००८ हा दिवस जागतिक इतिहासात महत्त्वाचा ठरला. बराक ओबामा ह्या उच्चशिक्षित , कृष्णवर्णिय माणसाला अमेरीकेच्या अध्यक्षपदा चा अधिकृत उमेदवार म्हणुन डेमॉक्रॅटिक पक्षाने निवडले ! जवळ जवळ १ लाख लोकांच्या उपस्थितित बराक ओबामा नी अध्यक्षिय उमेदवार पद स्विकारत एक इतिहास घडवला.
मी ह्या ऐतिहासिक सोहळ्याला डेनवर मधे उपस्थित राहु शकलो हे ...

मतदारराजा! रविवार, २४ ऑगस्ट २००८, १३:०७ (+०५:३०)

मी...झाड...संध्याकाळ...

मनू:मी उभा आहे!
मी:ते दिसतंच आहे! (वात्रट हसणं) तू मनू आहेस,हा तुझा आणखी एक चावटपणा आहे,मी तुला ओळखलंय.
मनू: (तरीही गंभीर) मी उभा आहे.
मी:च्यायला मग बस की!आज काय पहिल्यांदाच आलाएस?
मनू:मला वेळ नाहीए बसायला,मी उभा आहे!
मी: (मनूला निरखतो,तो सिरियस,मी पुन्हा वात्रट) काय?कुठलं घोडं मारायला जायचंय आज?
मनू: (आणखी गंभीर) राजा,ही चेष्टेची वेळ नाहिए.बरीच कामं पडलीएत.महापालिकेची निवडणूक ...

विवाहातल्या समस्या रविवार, २४ ऑगस्ट २००८, ११:४३ (+०५:३०)

मी...झाड...संध्याकाळ...

घटस्फोट हे वैवाहिक समस्येवरचं उत्तर आहे की ती आणखी एक समस्या आहे?
आपल्या समाजात सुरवातीला घटस्फोटाचा खूप बाऊ केला गेला, अजूनही केला जातो आणि विवाहबंधन टिकवण्याला महत्व दिलं जातं. असं बंधन खरंच टिकतं का? जबरदस्तीने ते टिकवणाऱ्या व्यक्तिला (या व्यक्ती म्हणजे पुन्हा जास्त करून स्त्रियाच) आपण ते महतप्रयत्नाने टिकवून ठेवल्याचं समाधान कदाचित मिळेल पण असं मारून मुटकून प्रयत्न ...

संस्कार सोमवार, २८ जुलै २००८, २२:४६ (+०५:३०)

मी...झाड...संध्याकाळ...

बैठं काम,दोन चार वेळ चमचमीत खाणं,बुडाखाली खाजगी किंवा सार्वजनिक दळणवळणाची साधनं,लिफ्टस् इत्यादी 'गरजा' असणारा माणूस जादूची कांडी शोधतो.क्षणार्धात शरीर तरूण,सडसडीत दिसावं यासाठी.अपरिहार्यपणे व्यायामाकडे वळावंच लागतं.त्यात खंड पडत रहातो.पुरेसा परिणाम दिसायला वेळ लागतो.निदान प्रयत्न करतोय हे समाधान सुरवातीला आशा देणारं असतं.
असे अनेक वळसे घेत घेत एके सकाळी मी सूर्यनमस्कार ...

नाटक संपले... गुरुवार, २४ जुलै २००८, २२:०४ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

नाटक संपले...
दोन दिवसाचे नाटक संपले... खेळ चांगलाच रंगला...
कोण जिंकलं ? ... मन्नुभाई... सिंग इज किंग ...
मनमोहन सिंग ये क्या चीज है हे जगाला दाखवुन दिलं ह्या नाटकानी.
२१-२२ जुलै चे दोन दिवसाचे नाटक हे दिल्लीच्या संसदेत रंगलले होते ते जगभर सर्वत्र लोकं पहात होते.. भारतात हि अगदी क्रिकेट मॅच असल्या प्रमाणे लोकं टिव्हि चॅनल्स लावुन पहात होते...
तर हि मॅच जिंकली कोणी ?
माझ्या मते ह्या ...

१४ फुटांचा त्रिवार निषेध! रविवार, ०६ जुलै २००८, १६:१३ (+०५:३०)

मी...झाड...संध्याकाळ...

हॅलोऽहॅलोऽ… हां! ऑं? छ्या! बिझी नेटवर्क! हे जमिनीवरचे लोक कुणालाही मामा किंवा ते-हे- अहो मंडळी- मंडळी म्हणजे मंडळ या शब्दांचे अनेकवचन! - तुम्ही जमिनीवरचे आम्हाला चांगले दोन अक्षरी फुल्या फुल्या बनवण्यात माहिर आहात! आता आम्हाला पाण्यात पाहणं सोपय तुम्हाला! कारण आम्ही पाण्यातलेच!
हे चौदा फुटांचं काय नवीन नाटक काढलयत मंडळी- आय मीन मंडळांनो!
आम्ही याचा ठाम निषेध करत आहोत.अहो, जुलै ...

नाटक, साहित्य आणि मनोरंजन होणं, विचार करायला लावणं… रविवार, ०६ जुलै २००८, १४:२४ (+०५:३०)

मी...झाड...संध्याकाळ...

मला एक माणूस म्हणून, एक प्रेक्षक म्हणून विचार करायला लावणारं नाटक आवडतं.एक लेखक,अभिनेता म्हणून मात्र असं वाटू लागलं आहे की विचार करायला लावणारं आणि करमणूक करणारं असे दोनच स्पष्ट भेद या माध्यमात नाहीत.विचार करायला लावणारं नाटक फक्त जे संवेदनशील म्हटले जातात त्यांच्यापर्यंत किंवा केवळ विचारवंतांपर्यंत पोहोचून उपयोगी नाही.सामान्य लोकांपर्यंत म्हणजेच जास्तीत जास्त ...

महायुध्द होणार ६ जुलै ला ... शुक्रवार, ०४ जुलै २००८, २२:३६ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

महायुध्द होणार ६ जुलै ला ....
रविवार ६ जुलै ला महायुध्द होणार आहे विम्बलडन च्या सेन्टर कोर्ट वर... नाडाल आणि फेडरर मधे !
सारया जगाचे लक्ष तर सेन्टर कोर्ट कडे असणार आहेच पण टेनिस रसिक ह्या सामन्या कडे वेगळ्याच द्रुष्टि ने पहात आहेत. फेडरर ला हरवु शकणारा एकमेव खेळाडु म्हणजे नाडाल ! फेडरर जर ह्या वर्षि विम्बलडन स्पर्धा जिंकला तर तो एक नवा विक्रम होइल. पाच वेळा विम्बलडन स्पर्धा ...

राजस्थान रॉयल्स नी जिंकला चषक आणि मनं सोमवार, ०२ जून २००८, १०:४० (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

शेवटच्या चेंडु पर्यंत रंगलेला अटितटिचा सामना आणि शेन वॉर्न नी खेचुन आणलेला विजय ! क्रिकेट रसिकांना आनंद देणारा हा आय पी एल २०-२० लीग चा अंतिम सामना सदैव स्मरणात राहिल तो शेन वॉर्न च्या नेतृत्वा साठि, युसुफ पठाण नी केलेल्या फलंदाजी आणि गोलंदाजी साठी, शेन वॉटसन नी केलेल्या गोलंदाजी साठी, पाकिस्तान च्या अकमल आणि सोहेल तनवीर नी केलेल्या खेळि साठि !
सदैव "लकि" ठरलेला कर्णधार धोनी ...

युवराज चा खोटा आत्मविश्वास नडला... रविवार, ०१ जून २००८, ००:२७ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

युवराज चा खोटा आत्मविश्वास नडला...
स्वतः च्या पायावर धोंडा पाडुन घेणे म्हणजे काय हे आजच्या पंजाब विरुध्द चेन्नाई तील सामन्यात बघायला मिळालं. युवराज चा पोकळ आत्मविश्वास आणि धोनी च शांत व खंबीर नेतृत्व उठुन दिसलं.
धोनी च नेतृत्व, मुरलीधरन नी घेतलेला झेल , पार्थिव पटेल नी केलेली तडफदार बॅटिंग, रैना चा ऑल राउन्ड ...