देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ब्लॉगच्या icon विषयी,शिर्षक smudge होतं त्या विषयी

नमस्कार,
खालील सुचना विचारात घेतल्यास बरं वाटेल.
धन्यवाद
सुचना.....१
"मराठी ब्लॉग विश्व" च्या मुख्यपानावर,डाव्या मार्जीनमधल्या शृंखलेमधील ब्लॉगांच्या यादी मधील कुठल्याही
ब्लॉगवर curser आणल्यावर जवळच उजव्या बाजूला एक छोटासा box येतो त्यावर प्रेशक,शेवटची नोंद वगैरे माहिती असते त्याच box मधे त्या प्रेशकाचा जो blog आहे त्याचा icon किंवा- symbol - म्हणा
जर का दिला गेला तर तो ब्लॉग कुणाचा आहे उदा." wordpress"चा आहे की "blogspot" चा आहे किंवा अन्य कुणाचा आहे ही माहिती मिळाली तर बरं होईल.
सुचना....२
शृंखलेतून ब्लॉगवर click केल्यावर थोडक्यात त्या ब्लॉग मधले सुरवातीचे लिखाणं येते आणि वरती त्या लिखाणाचे शिर्षक येते.हे शिर्षक जरा लांब झाल्यास उरलेले शब्द खालच्या नांवावर किंवा असलेल्या शब्दावर smudge होतात ते होवू न दिल्यास शिर्षक नीट वाचता येईल.
opera browser वर असं होतं.
सामंत

यावर काम करू

सामंत,

तुम्ही सुचवलेल्या सुधारणांवर आम्ही यथावेळ काम करू.

तुमच्या सूचनेबद्दल धन्यवाद,
- सहाय्यक