पीएमपी गाड्यांच्या पहिल्या दोन किलोमीटर प्रवासासाठी भाड्यात वाढ करण्यात येणार नाही. त्यानंतर प्रत्येक टप्प्याला एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी येत्या रविवारपासून (ता. २१) करण्यात येणार आहे. सध्या पहिल्या दोन किलोमीटर प्रवासासाठी तीन रुपये भाडे आकारण्यात येते. ते कायम ठेवण्यात आले आहे. चार किलोमीटरसाठी पाच ...