त्याचे येणे-जाणे
तो येतो तेव्हा असाच गर्जत येतो
तो जातो तेव्हा असाच बर्सत जातो
तो थांबे तेव्हा वाट कुणाची बघतो
साद धरेची तो तेव्हा ऐकत असतो
तो जातो तेव्हा वैशाख सरुनि जातो
मृग येतो तेव्हा गंध मातीचा लेतो
थेंबांच्या स्पर्शासाठी वसुंधरेची आस
येता धारा मग त्या भाव जिवंतचि होतो
बरसून दान देता नव सृजनचे लेणे
वर्षाऋतूचे हा साजन सजून घेतो
नाते अतूट ऐसे नभ ...