देवनागरी
Roman
Press F12 to toggle

दिनेश गावंडे

अपराधी शुक्रवार, १६ मे २००८, २१:४२ (+०५:३०)

डॉ.श्रीकृष्ण राऊत अभिरुची

कोवळ्या गोर्‍या अंगावर
फोकाने हिरवे वळ उमटवीत
पोराला शाळेत नेणार्‍या बापाने
आज काठीच्या आधाराने
वार्धक्याचा तोल सांभाळीत
सामानाबरोबर आणली ...

माती शुक्रवार, ०४ एप्रिल २००८, १७:३१ (+०५:३०)

डॉ.श्रीकृष्ण राऊत अभिरुची

भिंतीत खिळे ठोकताना
माती प्रतिकार करीत नाही
कॉंक्रिटसारखा;
उलट ती क्षमा करून टाकते तुम्हाला
ख्रिस्तासारखी.
सारवताना सुगंधही देते फुलासारखी.

तुम्ही अडकवा ...

विश्वसुंदरी रविवार, २३ मार्च २००८, २१:२८ (+०५:३०)

डॉ.श्रीकृष्ण राऊत अभिरुची

तू विश्वसुंदरी झाल्याच्या बातमीने
झळकले होते प्रत्येक वृत्तपत्राचे पान
तेव्हा माझीही फुगली होती छाती
आणि उंचावली होती मान.

तुझ्या आदर्शाविषयी ऐकून
तर फार बरे वाटले होते.
पण ओठांची लिपस्टिक सांभाळत
तू केलीस भाषा इथली गरीबी नष्ट करण्याची
तेव्हा थोडे खटकलेही होते.
आणि मंचावरून तोकड्या कपड्यात
ठुमकत कमरेला झोके देत चालताना पाहून
मला आठवली होती