देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी गझल

कालचेच होते गुरुवार, २५ सप्टेंबर २००८, २३:४८ (+०५:३०)

वाचून बघा

माझ्या पराभवाचे ते दाखलेच होते
सोडून हात गेले ते आपलेच होते

झाल्या चुका तरी थोरांनीच माफ केले
डोळे वटारलेले- ते धाकलेच होते

नावाजले जगाने सांगू तरी कुणाला
की नाव आपल्यांनी तर टाकलेच होते

झाली पहाट,झाला बभ्रा कसा ...

दूर मी जातो गुरुवार, २५ सप्टेंबर २००८, ०१:२४ (+०५:३०)

आशा जोगळेकर झु ळु क

दूर मी जातो अता मज साद तू घालू नको
बंध हे तुटले अता त्यां गाठ तू घालू नको ।

उत्तरें देतां समाजा, लाज तुज येईल गे
जे मी केलें, ते कसें, कां, प्रश्न मज घालू नको ।

घडलेच जे अपुल्या मधे ते राहू दे गुपितांत गे

हात देणारेच त्याचे.. बुधवार, ०६ ऑगस्ट २००८, २१:१५ (+०५:३०)

वाचून बघा

( एकाच  ‘जमिनी’तून आलेल्या दोन्ही रचना एकत्र देत आहे)
संपला विश्राम कामा लागुया
शोधुनी थकवा नवीन पाहुया

दाटून ओथंबणे बरसणे पुरे
खूप झाला शोक थोडे हासुया

मृत्युची कौतुके कोणी करावी
संपले नाविन्य त्याचे सांगुया

याचकांच्या वाढत्या गर्दीमध्ये
कुणी दाता भेटतो का पाहुया

घट्ट मिटुनी ओठ जीणे नको
जून झाले मौन ताजे बोलुया

रात्र सरली तारका ...

कोण आहे शनिवार, ३१ मे २००८, २१:१० (+०५:३०)

वाचून बघा वाचून बघा

ठरविले त्यांनीच होते मी कोण आहे
कोण मी हे सांगणारा,मी कोण आहे!

शपथा त्या स्मरुन आज वचने तुझी
खिन्न हासला आत तो कोण आहे

श्वास रोधुन बैसलो होतो किनार्‍यावरी
श्वास घेण्या की निघेल जो कोण आहे

तो जाणतो,मन राखण्या माझे परि

राहून गेले शनिवार, १७ मे २००८, ००:५५ (+०५:३०)

वाचून बघा वाचून बघा

बोलणे कित्येकदा होऊन गेले
सांगणे प्रत्येकदा राहून गेले
सत्य उठुन दिसलेच नाही
उठून बघणे राहून गेले
आसवे रुसवे गेले विरोनी
हासणे स्मरणात राहून गेले
गुंग बघण्यात सर्वांसवे मी
पाहणे बरेचसे राहून ...

जागुनी जगलो रविवार, ११ मे २००८, ००:४० (+०५:३०)

वाचून बघा वाचून बघा

तिमिरात उषेचे स्वप्न घेउनी जगलो
मी हार गळ्यातील हार मानूनी जगलो
संदर्भ रोजचे कालबाह्य होताना
मी इतिहासाला उरी घेउनी जगलो
तुडवून फुलांना खुशाल ते जाताना
मी कर्ज कळीचे शिरी घेउनी जगलो
मी त्याच ठिकाणी ...

ये असा रविवार, २७ एप्रिल २००८, २३:४२ (+०५:३०)

वाचून बघा वाचून बघा

बघ एकांत, बसू निवांत, जीवनाचा हट्ट आहे
भेटल्यावर काय बोलू, हे जरा अस्पष्ट आहे
पचवुनी आकांत माझे, शांत जग हे झोपलेले
जागवु त्याला कसे हे काय करणे इष्ट आहे ?
सुखमहाली दंगलो मी, दु:ख दारी तिष्ठले
स्वागता गेलो न म्हणुनि मजवरी ते रुष्ट आहे

सांगाल का ? सोमवार, २१ एप्रिल २००८, ००:१८ (+०५:३०)

वाचून बघा वाचून बघा

गाईले अधुरेच गीत मी, तिला सांगाल का
राहिलो जगास भीत, एवढे कराल का
हा भरुन आसमंत, मंद वाहतोय गंध
असेल ती कुठे इथेच, ठाव तो दावाल का
रातराणिच्या फुलांस, बहर आज येत खास
गेली ...

विसरलो विसरायचे शनिवार, २२ मार्च २००८, ०१:४४ (+०५:३०)

वाचून बघा वाचून बघा

…. विसरलो विसरायचे …
******************
ठरविले तेव्हाच होते मी तुला विसरायचे
आठवांत मग्न मी,  विसरलो विसरायचे
गंधलात, धुंदलात मयसभेत माझिया
आल्यावरि भानावर, अरे रे.. विसरायचे!
का म्हणुनी दुनियेचे दोष मला दाविसी
स्मरतो ...