देवनागरी
Roman
Press F12 to toggle

रोजचा (नसता)उद्योग

गोखूळवाडी बुद्रूकचा गंपू-भाग दूसरा रविवार, ०५ ऑक्टोबर २००८, १६:२७ (+०५:३०)

विनायक अनिवसे इनोबा म्हणे

एक दिवशी नंदू माने तालूक्याला गेला असताना त्याची वासूअण्णाशी भेट झाली. बर्‍याच दिवसांनी भेट झाल्यामूळे दोघांनी एकमेकांची ख्याली खुशाली विचारली.बोलता बोलता वासूने नंदूच्या मुलाची (गंपूची) चौकशी केली आणि पोरगं चांगल्या घरात जाऊन पडल्याचा त्याला मनोमन आनंद झाला.कणसेच्या भितीने वासूने आपल्या पहिल्या पत्नीच्या मुलाला-बाळूला आपल्याजवळ ठेवून घ्यायची नंदूला विनंती केली. बाळू ...

गोखूळवाडी बूद्रूकचा गंपू शनिवार, १५ मार्च २००८, ०४:१८ (+०५:३०)

विनायक अनिवसे इनोबा म्हणे

प्रस्तावना

गंपू ही एका असामान्य व्यक्तीमत्वाची असामान्य कथा आहे.मात्र "गंपूच्या चारीत्र्यामधे कृष्णाची झलक पाहायला मिळते व बरेचसे प्रसंग कृष्णाशीच संबंधीत असल्यासारखे वाटतात" असा माझ्या विरोधकांनी सूर लावला आहे. पण असल्या कारवायांना मी भिक घालणार नाही.ज्या पुस्तकाच्या एका आठवड्यात वीस हजार प्रती खपाव्या त्या पुस्तकाबद्दल विरोधकांचा जळफळाट होणे हे साहजिकच ...

साहित्यिकाच्या मार्गातील अडथळे शनिवार, ०८ मार्च २००८, ०२:२८ (+०५:३०)

विनायक अनिवसे इनोबा म्हणे

काल रात्रीपासून डोक्यात एक नवा कथानायक डोक्यात घोळ घालत होता,तेवढा झटपट लिहून काढावा म्हणून आज सकाळी जरा लवकरच उठलो.घराचं दार उघडत नाही तो समोरचा नाना आम्हाला सामोरा(खरंतर पाठमोरा)गेला.नको तो अवयव खाजवत बसाययची लोकाना भारी खोड.च्यामारी!उद्या त्याला स्क्रबिंग ब्रशच घेऊन देतो(ओशाळला तर ठिक-नाहीतर ब्रशचे पैसे वाया जायचे)सकाळी सकाळी नको त्या गोष्टी नजरेस पडतात.
म्हटलं लवकर ...

भावी आत्मचरीत्राची तयारी शनिवार, ०८ मार्च २००८, ००:३० (+०५:३०)

विनायक अनिवसे इनोबा म्हणे

आजकाल मला माझ्या भविष्याची फारच चिंता वाटते.माझ्या भावी आत्मचरीत्राचे काय होणार कोण जाणे!मोठमोठ्या लेखाकांनी त्यांची आत्मचरीत्रे लिहीण्याची सुरुवात लहानपणापासूनच केली होती म्हणे.त्याशिवाय का त्यांच्या जन्माच्या वेळच्या परिस्थीतीचेही ते वर्णन करतात.मी मात्र माझ्या आयुष्याची एवढी वर्षे फूकट वाया घालवली.आता आत्मचरीत्र लिहायाचे म्हणजे माझ्या जन्मापासूनचे सारे प्रसंग ...