मुंगी उडाली आकाशी....अन् पडली तोंडघशी !
आज सकाळी सहज जालभटकंती करताना Community Spark ही जाल-चावड्या या विषयास वाहिलेली एक जालनिशी सापडली. त्यातील काही नोंदींचे दुवे असे :
१) नियमांचे महत्त्व
२) चावडी अडखळू लागल्याचे इशारे
लेखक मार्टीन रीड पहिल्या नोंदीत स्पष्ट, जाहीर व लिखित नियमांचे महत्त्व विशद करतो. तो असेही म्हणतो की नियम लांबलचक व गुंतागुंतीचे नसावे. नियम स्पष्ट नसल्यास सदस्यांना कधी कधी मॉडरेशन पटत नाही कारण ...