देवनागरी
Roman
Press F12 to toggle

दोन ब्लॉगवर invalid password

माझी गझल मराठी : डॉ. श्रीकृष्ण राऊत
या माझ्या ब्लॉगवर म.ब्लॉ.वि.चे
चिन्ह बरोबर आले.पण
‘गाथा मराठी मनाच्या’ आणि ‘डॉ. श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता’
या दोन ब्लॉगवर मात्र
चिन्हाऐवजी invalid password येतो आहे.
क्रुपया व्यवस्थापन करावे.
-डॉ. श्रीकृष्ण राऊत

इतर दोन ब्लॉगांसाठी सुद्धा "Widget Code" तयार करावा लागेल.

डॉ. श्रीकृष्ण राऊत,

ही अडचण निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. नुकतेच एकापेक्षा जास्त ब्लॉग जोडण्याकरिता काही बदल करण्यात आले आहेत.

ही अडचण अशी दूर होईल.

तुम्हाला तुमच्या इतर ब्लॉगांचा पत्ता देऊन त्याबद्दल Widget Code मिळवावा लागेल. याकरिता तुमच्या खात्याच्या पानावरील "माझे ब्लॉग पर्याय" ह्या पानावर जाऊन तिथे खालीच असलेल्या रिकाम्या रकान्यांमध्ये तुमच्या इतर ब्लॉगची माहिती भरा आणि "विजेट कोड तयार करा" ह्या कळीवर टिचकी द्या.

तुमचे अधिक ब्लॉग असल्यास प्रथम दिलेल्या ब्लॉगांकरिता विजेट कोड तयार केल्यानंतर अधिक ब्लॉगाची माहिती जोडण्याकरिता पुन्हा एक रिकामा रकाना तयार होईल.

- सहाय्यक.