कळले नाही तूला कधी.........
आपल्या प्रत्येक भेटीत,
तुझ्यातली 'तू' च शोधीत होतो मी,
माझ्यातला 'मी'ही दिसलो नाही तुला कधी !
हवे होते तुला तुझ्या जगात 'मी',
पण् माझे जगच 'तू' होतीस
हे कळले नाही तूला कधी !
जाणुन सर्व तुझे बहाणे,
अनिर्वाच्च राहीलो मी,
पहील्या भेटीतला द्रुढ विश्वास
जाणवला नाही तूला कधी !
ननतरच्या सर्व भेटीत दुरावत गेलीस तू,
तू एकदा कधी प्रेम केले होतेस,
पण् माझे पहीले प्रेम्
कळले नाही तुला कधी........