ना परतीची वाट
Also kept on http://www.geocities.com/nity_leela/Na_partichi_Vaat2_TBIL_Mangal.doc
पंचतंत्रात एक खूप छान कथा सांगितली आहे. एक म्हातारा सिंह शिकार जमेना म्हणून तळयाच्या काठाशी राहू लागला. पणी प्यायला छोटे जनावर आले की तो त्याला मारुन खाऊ शकत असे. एकदा एक कोल्हा त्या जागी आला. दुरुनच निरसून पाहिले तो त्याला कळले की इथे प्राण्यांची जी पावले उमटली आहेत ती फक्त तळयाकडे जाणारी आहेत, तिकडून परत येणारी पावल दिसतच नाहीत. ...