("रंजिश ही सही" या गजलचे रूपांतर)
नाराज तू तरीही, दिलास दुखविण्यासाठी ये
ये, आणिक पुन्हा मज सोडून जाण्यासाठी ये
नसू देत पूर्वीचे ते संबंध आता तरीही
रिवाज काही दुनियेचे निभाविण्यासाठी तरी ये
कुणा कुणाला सांगावी विलगतेची ...
("रंजिश ही सही" या गजलचे रूपांतर)
नाराज तू तरीही, दिलास दुखविण्यासाठी ये
ये, आणिक पुन्हा मज सोडून जाण्यासाठी ये
नसू देत पूर्वीचे ते संबंध आता तरीही
रिवाज काही दुनियेचे निभाविण्यासाठी तरी ये
कुणा कुणाला सांगावी विलगतेची ...
कल्लोळ उठे क्षण एक
तम अफाट भवती दाटे
परि शुभ्र किरण आशेचा
दूरातुन मजसी खुणवे
सौख्य, वेदना, आशा आणि सांत्वना
तू सर्व काही, माझी अधुरी कविता
दाहक आणि शीतल, जवळीक आणि दुरावा
कधी पूर्णत्वाला जाशील, माझी अधुरी कवीता
चणे जेव्हां होते खायचे
तेव्हां खाल्ले लोखंडाचे
देव नाही जरी झालों
चक्कीचा पाटाच झालों
देव व्हावे किंवा व्हावे जातें
हे दगडाच्या हातीं कुठे असते?
मृत्यूनंतर मुक्ती देणे माझ्या हाती नसे
भुकेल्याला पीठ देतों, थोडके का हे असे?
हल्ली ...
ऐसे नव्हे की आम्ही कधी नास्तिक होतो
पाकदेवतेचे आम्ही नेहमीच भक्त होतो
घेतले घोट दोन, पण नैवेद्य तिला दावुनी
मोक्ष साधिला कधीच, ऐसे पंचामृत प्राशुनी
हृदये सांभाळती काही श्रीफळे वर्जुनी
मधुमेही मुंगळे परी गुळाला चिकटती
यकृते आम्ही अजुनी जोपासुनी ठेविली
वार्धक्यात कुणा आहे का ...
मी वाट पाहतो, मी वाट पाहतो
अज्ञात पहाटेची मी वाट पाहतो
किती साधु-संत आले नि गेले
शिवण्यास अछूतास मी वाट पाहतो
उत्कर्ष जीवनाचा उपभोगुद्या मला
व्याख्यान संपण्याची मी वाट पाहतो
उष:काल झाला, भूपाळी आली कानी
पाववाल्याची मी वाट पाहतो
रे ...
(I must admit the strong influence of the style of Late Bhausaheb Patankar in the following poem)
स्वप्नातल्या स्वप्नात मी स्वप्न एक पाहतो
छतावरील पंखा बघीत मी उभी रात्र काढतो
स्वप्नातल्या स्वप्नात मी असा जागा राहतो
पहाट होता होता कुठे डोळा जरासा लागतो
रम्य असते ती सकाळ, अन् ऊन्ह असते कोवळे
पक्षी असत किलबिलत, ...
भल्या रामप्रहरीं ... पाठाविलेस दूत
धरावया सूत ... नाकाशीं माझ्या
चला हो म्हणती ... आमुच्या सांगातीं
वाट लक्ष्मीपती ... पाहताहे
पोचूनिया तेथे ... ठोठाविलें दारा
जावें माघारा ... आलें उत्तर
क्षणिक दचकलो ... वाटलें पोचलों
कॉन्सुलेटा दारा ... अमेरिकेच्या
पुन्हा आला कानीं ... आंतुनीया ध्वनी
सांगितले त्यांनीं ... सौम्यभावे
हादरला स्वर्ग ... तूं येतां धडाधडा
आज दिसे मज क्षितिजावरती एक शुभ्र तारा
काळरात्रिचे वादळ सरले, शांत जाहला वारा
या राखेतुनि का न फुलावे पुन्हा तसेच निखारे
जाणुनि घ्याया सवाल करती माझे मला उसासे
अशीच झरते आठवण वेडी, फुटे बांध जखमांचा
तुटली निद्रा, असा वाहुनी गंध मुक्या स्वप्नांचा
अपुले परके, घर दाराचे, कशी बदलली नाती
खात्री ...