poetic justice
माझी कविता कुठल्याच आनंदसागरात भिजलेली नाही
वा दु:खाच्या दरीतही कोसळलेली नाही
माझी कविता हा मी स्वत:चा घेतलेला शोध आहे
स्वत:च निर्माण केलेल्या प्रश्नांना
स्वत:च दिलेलं उत्तर आहे
माझे शब्द आहेत माझे स्वर
शब्दसतारीवर मी हात रक्तबंबाळ होईपर्यंत ...