देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Anant [an2]

ब्लॉग शिर्षक: Anant [an2]
अनुदिनीकार/प्रेषक: An2
ब्लॉग पत्ता: http://antur.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

भेट रविवार, ११ जून २००६, १४:४२ (+०५:३०)

भेट

बंद खोलीत आसवे काही
काजव्यांचे जणू थवे काही

भेट नव्हतीच ती, धुके होते
भेटले फक्त गारवे काही

बोललो, काय बोललो नाही
आठवे तू , न आठवे काही

दोन डोळ्यांमधील आकाशी
हिंडले मौनपारवे काही

तू न पुसलेस मी कसा ...

तू नसताना शनिवार, २७ मे २००६, २२:५७ (+०५:३०)

तू नसताना
तुझ्या सयींच्या
उधाण लाटा
चहुदिशांना

तू नसताना
उजाडलेल्या
भणंग वाटा
चहूदिशांना

च्यायला मी काय खोटे बोलतोय काय!!! शनिवार, २९ एप्रिल २००६, २३:३१ (+०५:३०)

च्यायला, प्रेम म्हणजे असतं काय,
खाली डोके वर पाय,
नुसताच गोंधळ, कल्लोळ सारा,
बोला मी खोटे बोलतोय काय!!!!

पण प्रेमात असं व्हावचं लागतं,
थोडसं हसावं अन थोडसं रडावंच लागतं,
धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं,
बोला मी खोटे बोलतोय ...

हिंदू रविवार, २३ एप्रिल २००६, २३:५४ (+०५:३०)

माझे अवघे मी पण हिंदू
आयुष्याचा कणकण हिंदू,
ह्रदयामधले स्पंदन हिंदू
तन-मन हिंदू, जीवन हिंदू !

दरीदरीतिल वारे हिंदू
आकाशातिल तारे हिंदू,
इथली जमीन, माती हिंदू
सागर, सरिता गाती हिंदू !

धगधगणारी मशाल हिंदू

पाहिले तुला हळूच सोमवार, १७ एप्रिल २००६, २३:२२ (+०५:३०)

पाहिले तुला हळूच काल मी तिथे वळून
रुपमोगरा मनात दर्वळे तुझा अजून

ओतले मधाळ गोड रूप साजिरे तुझ्यात
चंद्र पाहता वरून लाजतो तुला बघून

आजकाल आसपास होतसे तुझाच भास
प्राण प्राण रोम रोम गातसे तुझीच धून

काढतो कसे बसे ...

हा एकटेपणा सोमवार, ०३ एप्रिल २००६, २२:०८ (+०५:३०)

हा एकटेपणा
ही शांतता
शब्द सोडून गेल्या नंतरची

आता त्यांची
खूप आठवण येते
ते येत नाहीत

माझ्यावर त्यांचा राग
अथवा नशिबाचा भाग
त्यांनाच माहित

पण आशा असतेच ना
ती जात नाहीच
कदाचित . . .
ते
कविता होऊन ...

पाहिले तुला हळूच.. गुरुवार, ३० मार्च २००६, २२:१८ (+०५:३०)

पाहिले तुला हळूच काल मी तिथे वळून
रुपमोगरा मनात दर्वळे तुझा अजून

ओतले मधाळ गोड रूप साजिरे तुझ्यात
चंद्र पाहता वरून लाजतो तुला बघून

आजकाल आसपास होतसे तुझाच भास
प्राण प्राण रोम रोम गातसे तुझीच धून

काढतो कसे बसे ...

तू भले सांग जगाला ! बुधवार, २९ मार्च २००६, २१:१६ (+०५:३०)

तू भले सांग जगाला
तू कधी प्रेमच नाही केलंस

पण मी येईनच फिरून
तुझ्या प्रत्येक कवितेच्या

प्रत्येक ओळीच्याप्रत्येक शब्दातून
आणि करीन तुला अस्वस्थ, उदास,सुन्न, विषण्ण

खात्री आहे मलाजेव्हा होईल
अनावर तुलालपवून ...