शून्य (Shunya) : Online suspense thriller Marathi novel
बॉस आणि इतर पोलीस टीव्हीच्या समोर उभे राहून संपूर्ण अमेरिकेत एखाद्या वणव्यासारख्या पसरलेल्या दंग्याच्या बातम्या पाहत होते. मधून मधून फोन वाजत होता. तो एक पोलीस अधिकारी मदतनीस अटेंड करीत होती. बॉसने दुसरा न्यूज चॅनल लावला. तिथेही तेच. सगळ्या न्यूज चॅनल्सवरती त्याच जाळपोळ, लाठीचार्ज , अश्रूधूर सगळ्या दंग्याच्याच बातम्या.
तेवढ्यात जॉन आवेशानं आत आला. त्याच्याकडे सॅमने ...