देवनागरी
Roman
Press F12 to toggle

चर्चा मराठी शुद्धलेखन व्याकरण

शुभानन गांगल यांचा "मराठी - एक मुक्त भाषा" हा लेख सोमवार, १८ फेब्रुवारी २००८, ०७:१५ (+०५:३०)

मिलिंद / Milind मुंगी उडाली आकाशी....अन् पडली तोंडघशी !

कालच्या (१७-०२-०८) 'लोकसत्ता'त प्रकाशित झालेला श्री. शुभानन गांगल यांचा "मराठी - एक मुक्त भाषा" हा लेख वाचून मला एक सामान्य वाचक म्हणून पडलेले काही प्रश्न, सुचलेले काही मुद्दे, व काही आक्षेप इथे चर्चेसाठी मांडत आहे.

"मराठी शुद्ध लेखनात चूक न होणारी व्यक्ती सापडणे कठीण आहे."
या वाक्यात 'शुद्धलेखनात' असे न लिहिता "शुद्ध लेखनात" असे फोड करून लिहिण्याचे प्रयोजन काय? 'शुद्धलेखन' या ...