माझी कविता आता माझी सवत झालीय,
कारण ती आता त्याला,
माझ्यापेक्षा आवडु लागलीय.
तो नेहमी म्हणतो,
"राणी, माझ्यावर तु कविता कर,कवितेतुन बरस माझ्यावर,कवितेतुनच प्रेम कर." माझा प्रश्न,"राजा, फक्त तु एकदाच ठरव,तुला मी आवडते की कविता?याचं तु कोड सोडवं." यावर त्याचं उत्तर,"अग, तुच ...