देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आमटी/ कढी/ सार

चण्याचे पिठले सोमवार, २४ मार्च २००८, २१:१८ (+०५:३०)

Chakali

Pithale

साहित्य:
३/४ मध्यम वाटी चण्याचे पिठ
१ कांदा
३-४ लसूण पाकळ्या (ऑप्शनल)
फोडणीचे साहित्य: मोहोरी, जिरे, हिंग, १ लहान चमचा हळद, कढीपत्ता
२-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
३-४ आमसुल
२-३ चमचे तेल
मिठ
कोथिंबीर

कृती:
१) चण्याचे पिठ पाण्यात गुठळ्या न होता मिक्स करून घ्यावे.
२) कढईत तेल गरम करून मोहोरी, जिरे हिंग, हळद, कढीपत्ता, हिरव्या ...

कढीगोळे शुक्रवार, १४ मार्च २००८, २३:२३ (+०५:३०)

Chakali

Kadhi Gole

साहित्य:
गोळ्यांसाठी :
पाउण वाटी चणाडाळ
१ चमचा आलेलसूण पेस्ट
१ लहान चमचा मिरची पेस्ट
१/२ चमचा हिंग
१ लहान चमचा हळद
१ लहान चमचा जिरेपूड
मीठ
कढीसाठी :
२ वाट्या आंबट दही
१ चमचा भरून चणापिठ
फोडणीसाठी: २ चमचे तेल/तूप, मोहोरी, जिरे, १/२ चमचा हिंग,१ चमचा हळद
५-६ कढीपत्ता पाने
१/२ लहान चमचा आलेपेस्ट
२ लसूण पाकळ्या (ऑप्शनल)
२ हिरव्या मिरच्या

पालकाची पातळ भाजी शुक्रवार, २९ फेब्रुवारी २००८, २३:१९ (+०५:३०)

Chakali

Palakachi Patal Bhaaji

मला अळूची भाजी प्रचंड आवडते. पण या अमेरीकेतील Indian Stores मध्ये कोमेजून गेलेला अळू बघून तो घ्यावासाच नाही वाटत !! यावर माझ्या सासुबाईंनी एक मस्त आयडीया सांगितली. अळूच्याच भाजीची चव असलेली पालकाची सुद्धा भाजी करता येते !!
हि पालकाची भाजी चवीला अगदी अळूच्या भाजीसारखी लागते (अळूचे फदफदे). ज्यांना अळूची भाजी आवडते आणि अळू जर सहज उपलब्ध नसेल तर हि भाजी नक्की करून पाहा.

टोमॅटो सूप / सार मंगळवार, २६ फेब्रुवारी २००८, ००:३७ (+०५:३०)

Chakali

Tomato Soup

साहित्य:
१/२ किलो टोमॅटो
१ चमचा तांदूळ पिठ
२ तमालपत्र
१ लहान चमचा जिरं
१/२ चमचा जिरपूड
१ चमचा तिखट
१ चमचा तूप
हिंग
दिड चमचा साखर
चवीपुरते मिठ
कोथिंबीर

कृती:
१) टोमॅटो कूकरमध्ये शिजवून घ्यावेत(कूकरमध्ये ३ शिट्ट्या कराव्यात). थंड झाले कि त्याची साले काढावीत.
२) तांदूळ पिठ १/२ वाटी पाण्यात गुठळ्या न होत्या कालवून घ्यावे.
३) थंड झालेल्या टोमॅटोचा ...

इंग्लिश आमटी शुक्रवार, १५ फेब्रुवारी २००८, २२:३३ (+०५:३०)

Chakali

English Amati

इंग्लिश आमटी म्हणजेच थोडक्यात सांगायचे झाले तर डाळींचे सूप !! हि जरी आमटी असली तरी ती भाताबरोबर न खाता पावाबरोबर खातात. आणि आजारपणात किंवा तुम्ही आजारी नसलात तरीही हि आमटी नुसती प्यायलाही छान लागते.

साहित्य:
१ ...