देवनागरी
Roman
Press F12 to toggle

हास्यकविता- असेही एक प्रेमपत्र (पराग विलास खैरनार,सुचिता नगर, नाशिक )

प्रिये.., केस तुझे कुरळे कुरळे,
फिरती त्यावर किती ग झुरळे ..१..
नाक तुझे ग वर्णु मी काय.. ,
ई...म्ह्शीने जसा त्यावर दिला ग पाय ! ..२..
गाल तुझे हे गोबरे गोबरे ,
जसे गं काळ्या पाठीचे खोबरे ..३..
चंचल बहु असे तुझ्या तिरक्या नजरेचा गं झोका,
at a time चुकतो... त्यामुळे दोघा बघ्यांच्या ह्रुदयाचा गं ठोका ..४..
भारद्स्त बहु असे तुझे गं प्रिये वजन,
मला तर बुवा स्मरे टाकी गैसची,एसो अथवा बरसन ..५..
ईच्छा नाहीये माझी तुझे पाय बघायची,
सवय नाहिये वाटतं तुला आंघोळ करण्याची ..६..
आगमनाने तुझ्या ,होई शिरकाव मंद त्या 'चमत्कारिक' गंधाचा ,
आता किती गं घेशील गजर्‍यातल्या त्या कोमेजलेल्या फुलांचा ! ..७ ..
आवाज हा तुझा किती गं किनरा,
तूटलेल्यांपैकी एकच उरलिये तार,
अन तरी ही जसा वाजवला जातोय तानपूरा ..८..
बहूगुण संपन्न अन आहेस सुस्वरूपी ,
फोटो तुझा असा येई जशी बघतोय कार्बन कॉपी ..९..
पाहूनी अदा या तुझ्या अश्या एकाहूनी एक सरस,
वाटे मला..दूर जंगलात ...कुठे तरी...विव्हळू लागलाय जसा गं तरस !..१०.
अखेरची ईच्छा आहे माझी तुझ्यासाठी चंद्रावर ताजमहाल बांधण्याची,
प्लॉट तर कधीचाच् विकत घेतलाय ,
वाट गं पाहातोय केवळ तुझ्या गचकण्याची !

.....तुझाच ,टग्या.
(पराग विलास खैरनार,सुचिता नगर, नाशिक. pk118@zapkmail.com )

तुम्हाला स्वतःचा ब्लॉग सुरू करायचा आहे काय?

नमस्कार,

ह्या फोरम्स ब्लॉग किंवा कविता लिहिण्यासाठी नव्हेत. तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्लॉग सुरू करायचा असेल तर कृपया येथे पहा: http://marathiblogs.net/start_marathi_blog

- सहाय्यक.

१४ फेब्रुवारी २००७???

हास्यकविता- असेही एक प्रेमपत्र (पराग विलास खैरनार,सुचिता नगर, नाशिक )
बुधवार, १४ फेब्रुवारी २००७, १८:४९ (+०५:३०) — pk118

Ithe kaahitari gadbad zaali aahe asa vatatay. :)

गडबड नव्हे!

सध्या दुसऱ्या कुठल्या तंत्राच्या अभावाने "चुकलेले विषय" ह्या विभागात मोडणारे लेखन मुख्यपृष्ठावर दिसू नये याकरीता आम्हीच सध्या त्या विषयाची लेखन दिनांक एका वर्षाने मागे हलवली आहे. आम्ही ह्या लिखाणाच्या प्रेषकांशी संपर्क साधून स्वतःचा ब्लॉग इतरत्र उघडण्याकरीता मदत करत आहोत.

- सहाय्यक.