देवनागरी
Roman
Press F12 to toggle

प्रियांका...........चार शब्दांच्या सहवासात

अनुदिनीकार/प्रेषक: Priyanka
ब्लॉग पत्ता: http://jyo-priyanka.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

*** वाळुचे घर *** सोमवार, ११ फेब्रुवारी २००८, २०:२६ (+०५:३०)

*** वाळुचे घर ***
शेणाचे ना मेणाचे होते
माझे घर वाळुचे होते.........

कावळा हि मज जैसा बुद्धु
पण चिमणीला डोके होते
माझे घर वाळुचे होते.........

रंगित सुंदर शिंपले
अन् छतावरती तारे होते
माझे घर वाळुचे होते.........

सुखाला सीमा ...

भोगी (पुरुष) रविवार, २८ ऑक्टोबर २००७, १२:०६ (+०५:३०)

भोगी (पुरुष)

नको ठेवूस सखे स्त्रिये तू
विश्वास कोणा पुरुषावरती
तुझ्या शिलाचे फक्त भोगत
े त्यांना कोणाची लाज न भिती

रुप न बघतील गुण न बघतील
पुरुषाची फक्त तुझ्या शिलावर प्रिती
तू माणशील त्याला देव माणूस
पण ...

तुझ्या आठवणीचा पाऊस शनिवार, २७ ऑक्टोबर २००७, १७:०१ (+०५:३०)

तुझ्या आठवणीचा पाऊस
मला चिंब चिंब करतो

कधी कोरडाच येतो
कधी रिमझीम बरसतो
कधी अश्रुंचा पूर घेवून येतो

आवडत मला या पावसात भिजायला
तुझ्या आठवणीत न्हाऊन निघायला

तुला हि आवडत का रे
या पावसात भिजायला?

---------- सख्या येरे परतुनी ------------------लागते ग ... शनिवार, २७ ऑक्टोबर २००७, १६:५२ (+०५:३०)


---------- सख्या येरे परतुनी ------------------

लागते ग ओढ सख्याची
कसे आवरू गं मनाला
सखा माझा दूरदेशी
कसे सावरु गं मनाला

सखा येईल परतुनी
वाट त्याची गं पाहते
स्वागतास गं त्याच्या
चंद्र तार्यास बोलाविते

सखा येईल एक ...

-------------आभास------------- शांत शांत एकांतहात ... शनिवार, २७ ऑक्टोबर २००७, १६:४६ (+०५:३०)

-------------आभास-------------
शांत शांत
एकांत
हात तुझा
हातात

मन माझे
बेभान
चित्त तुझ
े डोळ्यात

तुझा माझा
संवाद
शब्दांविणा
शब्दांत

अचानक...........

आड येई
प्राक्तन
दूर तुज
नेण्यास

किती केला

---------- नाते तुझे नी माझे ------------पिता, भाऊ, ... शनिवार, २७ ऑक्टोबर २००७, १६:२९ (+०५:३०)

---------- नाते तुझे नी माझे ------------

पिता, भाऊ, मित्र, पती आणि पुत्र
किती वेगळे हे शब्द
प्रत्येकाचा अर्थ निराळा
प्रत्येकाचा भाव निराळा

पण तुझ्यासाठी
हे सारे शब्द एकच होतात
अन माझ्यासाठी
हे सारे शब्द सार्थकी लागतात.

अस का होतं.......... खरच हे अस का होतंआपल्या ... गुरुवार, १८ ऑक्टोबर २००७, १७:१७ (+०५:३०)

अस का होतं..........

खरच हे अस का होतं
आपल्या जवळ येणार छानस फुलपाखरू
अचानक दूसर्या फुलाकडे जातं

खूप दूर् असताना पाहिलेल असत त्याला
वाटतं हे फक्त आणि फक्त आपणाकडेच यावं
छान दोन घिरट्या घेत ते माञ दुसर्याकडे जातं

सांजवेळ निस्तब्ध ऐशा सांजवेळी तु ... गुरुवार, १८ ऑक्टोबर २००७, १७:०४ (+०५:३०)

सांजवेळ

निस्तब्ध ऐशा सांजवेळी तु जवळी असशील का
घेऊनी हातात हात तु जवळी बसशील का
वीरहीणी सरीता बघ चालली भेटण्या सागरास
तडपुनी वीरहात माझ्या तु ही मला भेटशील का
पक्षी ही लगबग चालले
घरट्यात आपुल्या ...