एके दिवशी स्वप्नामध्ये संत ज्ञानेश्वर आले |
करुनी, करावी गंमत म्हणुन प्रश्न मी त्यांना विचारले||
मी म्हणालो - ज्ञानदेवा, तुमची फार मजा होती |
मांडे भाजण्यासाठी चक्क तुम्ही तुमची पाठ तापवली होती ||
मलाही जरा सांगाल का? पाठ कशी तापते|
कारण गॅसच्या रांगेत उभा राहुन आमची पाठ दुखते ||
हे तरी तुम्हाला सांगावच लागेल, रेडा बोलला कसा |
चार वेद आणि शास्त्र-वेद पुराण, नेमका ...