देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आनंदयात्रा

ब्लॉग शिर्षक: आनंदयात्रा
अनुदिनीकार/प्रेषक: आनंदयात्री
ब्लॉग पत्ता: http://anandyatra.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

घनगड आणि तैलबैला बुधवार, ०३ डिसेंबर २००८, १०:५५ (+०५:३०)

प्रस्तुत कथेतील किल्ल्यांवर बाईकवरून जाणे ही एक दुरापास्त चूक आहे! आणि त्यातही ’अमुक एखाद्या रस्त्याने जाऊ नका’ हा जाणत्यांचा सल्ला न ऐकता जाणे ही किमान या बाबतीत घोडचूक आहे! पण आम्ही या दोन्ही ...

रोहिडा उर्फ विचित्रगड बुधवार, ०३ डिसेंबर २००८, १०:५२ (+०५:३०)

ट्रेक हे एक न सुटणारे व्यसन आहे. ते एकदा लागले की मग काळ-वेळ, तिथी-नक्षत्र, सणवार यापैकी कशाचेही भान राहत नाही. खूप दिवसांपासून मनात असलेली दिवाळीत ट्रेकला जायची इच्छा यावर्षी पूर्ण झाली, आणि तीही ...

पेब किल्ला बुधवार, ०३ डिसेंबर २००८, १०:५० (+०५:३०)

यावेळी ठरवलेला किल्ला होता - "किल्ले पेब उर्फ विकटगड". पुणे - मुंबई लोहमार्गावर नेरळ स्टेशन आहे. त्याच्या पाठीमागे असणाऱ्या माथेरान या सुप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणाला लागून पेब किल्ला आहे. यावेळी ६ जण ...

केंजळगड बुधवार, ०३ डिसेंबर २००८, १०:४९ (+०५:३०)

एखादी गोष्ट नेहमी डोळ्यासमोर असावी, पण आपल्या वाट्याला न यावी, तसं काहीसं केंजळगडाच्या बाबतीत होत होतं. एका वर्षापूर्वी जेव्हा रायरेश्वराला पहिल्यांदा गेलो, तेव्हा कोर्ले गावाच्या डाव्या अंगाला ...

चेहरा शनिवार, १६ फेब्रुवारी २००८, १३:२५ (+०५:३०)

भावनेशी पार माझ्या खेळून चेहरा गेला
रंगणारा खेळ अर्धा मोडून चेहरा गेला

मैफलीचे श्रेय माझ्या नाही कधी मना आले
भैरवीला नाव माझे गाऊन चेहरा गेला

बोलतो मी साचलेले माझ्या मनी दर्पणाशी
जाणतो तो, ...

सखी शनिवार, १६ फेब्रुवारी २००८, १३:२२ (+०५:३०)

मनास वाटे असेच व्हावे
कुणा सखीच्या मनी भरावे

झळा उन्हाच्या, जिवास तलखी
बनून छाया तिला जपावे

जरी दिसाया नसलो सुंदर
सुन्दर आहे, तिला पटावे

चिडून, "गेला उडत" म्हणावे
मलाच घेउन तिने उडावे

दवात ...

हुंदका शनिवार, १६ फेब्रुवारी २००८, १३:२० (+०५:३०)

हुंदका साधा तुझा सांगून गेला
टाळले तू, मात्र तो बोलून गेला

दाटले आभाळ जे तव पापणीला
कोरलेले भाळ ते दावून गेला

पार होता वेस संगे गाव माझा
लक्तरे वेशीवरी टांगून गेला

भय अखेरी ...

पाऊलवाट शनिवार, १६ फेब्रुवारी २००८, १३:१५ (+०५:३०)

सगळं कसं बदलत चाललंय!
हे जाणवतंय की, दूर दूर चाललंय...

ओळखीचे शब्दही आता अनोळखीपणे कानावर येऊ लागलेत,
कधीकाळी अंतराच्या पार गेलेले ते आता खरंच अंतरु लागलेत...
काही ओळखीच्या खुणा सापडताहेत का? - मी ...

हाक रविवार, १० फेब्रुवारी २००८, २३:३४ (+०५:३०)

धुक्यात जाती हरवून वाटा
चिंब चमकती नवथर पाने
झाकून घे‌ई धरा स्वत:ला
गर्द नव्या हिरव्या गर्दीने

गर्दी नेई अवखळ पाणी
शेते गाती निर्झर गाणी
गंधित सुमने हर्षित सु-मने
वेचित जाती कुणी ...

"Magazine पाहावं काढून" - एक स्मरणयात्रा रविवार, १० फेब्रुवारी २००८, २३:१२ (+०५:३०)

२१ एप्रिल २००३, रात्री ११.३०
आजचा दिवस मी कधीही विसरणार नाही, कध्धीच नाही! हा दिवस भाग्याचाच! माझं आणि आमच्या साऱ्यांचं लाडकं स्वप्न असलेल्या पहिल्या CD-magazine चं प्रकाशन आज झालं. ...