देवनागरी
Roman
Press F12 to toggle

श्रीधरच्या कविता....

ब्लॉग शिर्षक: श्रीधरच्या कविता....
अनुदिनीकार/प्रेषक: Shridhar
ब्लॉग पत्ता: http://manoharee.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

पहाट... शुक्रवार, ०७ मार्च २००८, ११:५० (+०५:३०)

त्या उंच कड्याच्या टोकाशी...

पहुडलेलो... आपण दोघेच...

शांत निरव रात्र...

चांदण्या अगदी हाती आलेल्या जणू...

आणि खालची भयाण दरी...

ती कधीच हरवली अंधारात...

तू मी आणि चांदण्या मात्र...

डोळा कधी लागला समजलंच नाही...

...

सुदर्शन... शुक्रवार, ०७ मार्च २००८, १०:२६ (+०५:३०)

कृष्णा...

माझ्याहातुन घडतील शंभर अपराध,

याची योजना तयारच होती तुझी,

फक्त अपराध करणं तेवढं माझ्या हाती...

आम्ही सगळे तुझीच रुपं ना रे?

मग हा सर्व खेळ मांडलासच कशाला?

अन त्यातही मी असला रडका गडी का?

कदाचित एक इशारा द्यायचा असेल तुला,

माझ्या ...

सुदर्शन... सोमवार, ०३ मार्च २००८, १७:४७ (+०५:३०)

कृष्णा...

माझ्याहातुन घडतील शंभर अपराध,

याची योजना तयारच होती तुझी,

फक्त अपराध करणं तेवढं माझ्या हाती...

आम्ही सगळे तुझीच रुपं ना रे?

मग हा सर्व खेळ मांडलासच कशाला?

अन त्यातही मी असला रडका गडी का?

कदाचित एक इशारा द्यायचा असेल तुला,

माझ्या ...

ऋणानुबंध शनिवार, ०९ फेब्रुवारी २००८, १६:२९ (+०५:३०)

शाळेच्या ग्राउंडमधला एक मोठ्ठा दगड...

लपाछपी खेळताना राज्य घ्यायची जागा,
पिंट्याला ’राज्य घे राज्य’ म्हणून तिथेच रडवलेलं...

लोखंडे बाईंचा पहिला प्रसाद मीच खाल्लेला,
त्याच दगडावर आख्या शाळेसमोर पूर्ण दिवस अंगठे धरुन ...

बाप मंगळवार, ०५ फेब्रुवारी २००८, १७:५० (+०५:३०)

दोघांत अगदी गाढ मैत्री, एकमेकांना ’अरे-तुरे’ करायचे
छोट्या-मोठ्या कारणांवरुनसुद्धा गमतीत भांडायचे

"चल येतोस का पिक्चरला" विचारलं पोरानं बापाला
"नको रे,आज त्यापेक्शा दुसरीकडे जाउ भटकायला"

"पप्पा,असं काय रे करतोस, काय ...

उड रे पाखरा मंगळवार, ०५ फेब्रुवारी २००८, १७:४४ (+०५:३०)

उड उड रे पाखरा, उंच उंच गगनात
तुझ्या मनात ताकद ,आता जोड रे पंखात

उड उड रे पाखरा, ने यश दूरदेशी
जरा पेटव दिवटी,तुझ्या घरट्याच्यापाशी

उड उड रे पाखरा, नको होऊस हळवा
अरे तुझ्यासाठी माऊलीनं,पिऊ घेतला वणवा

उड उड रे पाखरा, ...

शिकवणी मंगळवार, ०५ फेब्रुवारी २००८, १७:४० (+०५:३०)

परवा एक वेगळीच फूटपट्टी मिळाली
त्यामुळे झाला एक नवीनच खेळ सुरू
एकेकाच्या दु:खाची मोजायची फक्त खोली
"भारी-दु:ख-वाल्याची" शोधमोहिम सुरू

सर्वात पहिल्यांदा आपलंच मोजावं म्हटलं
आणि काय सांगू? चांगलं पंचवीस फूट भरलं!!
मग ...

अंकुर मंगळवार, ०५ फेब्रुवारी २००८, १७:३७ (+०५:३०)

अगदी खोलवर गाडलं गेलेलं

ना हवा, ना पाणी

वरती सग्गळं काही सुरळीत, आलबेल

शंकाही यायला नको त्याच्या अस्तित्वाची....

पण तू परवा जो नांगर फ़िरवलास ना, सगळ्यावरुन!!

कानाकोपरा नाही ठेवलास शिल्लक....

ते जाऊदे, जखम तर ...

जन्मखुण शनिवार, ०२ फेब्रुवारी २००८, ११:२३ (+०५:३०)

काळ दु:ख करतो हलकं, असं ऐकलं होतं
स्वत: अनुभवायला मिळेल, वाटलं नाही
जखम आयुष्यभर पुरेल असं वाटलं होतं
कुणी आलं रिझवायला जरि,ऐकलं नाही

कळंत गेलं हळू हळू जग आसपासचं
समजलं की लोक घायाळंच जगतायत
माझं माझं म्हणत होतो, ते ...

शब्दार्थ बुधवार, ३० जानेवारी २००८, १७:३५ (+०५:३०)

शब्दार्थ

एकेका शब्दाशी असं नातं जोडलं होतं म्हणुन सांगू!!

की मृदगंध म्हटल्यावर डोळ्यांनी आपोआप मिटावं
आणि राउळ स्मरल्यावर हातांनी जोडलं जावं

धुकं आठवल्यावर नाकाचा शेंडा ओला व्हावा
'सय' म्हटलं की हृदयात उठावा ...