अपूर्ण
इच्छा,आकांक्षा
फक़त तुलाच आहेत का?
ज्या की नेहेमी सपूर्ण व्हायला हव्यात
दिवस भर काम करून
मी सुद्धा थकून आते
पण तुला त्याचे काय
तुला हवे ते तू ओरबाडून घेतोस
कधी प्रेमाने,कधी हक्क गाजउन
आणि माझ्या भावनांचे काय?
जेव्हा तू थकून येतोस
बोलत सुद्धा नाहीस
प्रेमाचा स्पर्श तर दूरच
मनातली आग देहात पसरते
कामिनी धगधगते
कदाचित सकाळ परयन्त
वीझतही असेल
पण एक अपूर्णतेची
ठिणगी सुलगाउन………………….. ...
उष्णता,आद्रता,घालमेल भावनांची
का होतेय आज मनात इतकी
कशा साठी तळाशी साचलेल्या
विचारांची उत्क्रांती होतेय पुनष्प
परत तीच चाहूल लागतेय
दूर गेले होते ना मी जिच्या पासून
मग का धावताहेत तेच विचार परत परत
प्रकाशाच्या गतीने,माझ्या दिशेने
बंद केलेल दार ठोठावत आहेत
निघून जा,नकोय मला तुमची संगत
अश्रू संपलेत सगळे माझ्या तळ्यातले
माझ विश्वच बदलय मी आता
तुम्हाला थारा नाही या ठिकाणी
मागे फिरा,बस तुमच भ्रमण सपलय
उद्वेग शिथिल होतो आहे दिसतय
मनाला काबूत ठेवण्याच काम मी कर शकेन का?
हा लावा खरच शांत झालाय? ...
घरटे बांधले तुला
इवलसा चिमना जीव कुठे ग लपला
माझ्या अंगानातला चिवचिवाट कुठे हरवला ?
पुर्वी असायची किती लगबग,किलबिल
चिमनी आणि चिमन जोडीने बसायचे
चालायची थोडी कुजबुज,थोडे प्रेमाचे हितगुज
कधी आपसात कधी माझ्याकडे पाहून हसायचे
झाले तुझे काम,दाणा नाही ठेवलस अजुन
म्हणून विचारायचे ,लटकेच रागवायचे
दाण्याचा नाश्ता करून जायाच असायच
दिवसभर फिरून काम करायाच
लहानसे तिनके,काड्या,कापुस आणून
स्वतःच टुमदार घरट वीणायच
वेळ आली की अंडी उबवायची,पिल्ल निघायची
किती उब होती न तुझ्या घरट्यात,प्रेमाची,मायेची.
त्यातली थोडी उब मला सुद्धा मिळायची
किती गर्व होता तुला पिल्लानवर
सुरेख आहेत म्हणून शंभरदा सागायचिस
मला लागल खुपल तर विचारपूस करायचिस
अगदी आपल्या माणसा सारखी काळजी
दिसायची न मला तुझ्या डोळ्यात,हावभावात
अगदी जिव्हाळ्याच नात होत,तुझ,माझ आणि पिल्लान्च
सुख दुख आपल होत न अगदी एका घरच
मग आता ग काय झाल,कुठे बिनसल
माझ मायेच पाखरू कुठे अचानक उडाल ?
असताव्यस्त झालय घरट,रिकाम झालय माझ घर
निरव शांतता,काळजात रुतनारी
खोल वर भेदलय मनाला असा बोचरा शुकशूकाट
परत हवाय मला तो ओलावा,तो गोंधळ
माझ्यावर ...
राधिका -तारिणी
कृष्ण-राधिकेच्या निश्चल प्रेमा बद्दल,एकमेकांच्या अतूट स्नेहा बद्दल
,कृष्ण भार्या रुख्मिनि च्या मनात सदैव एक सल असे.राधिकेचा कधी
द्वेष नाही केला रुख्मिनिच्या मनाने,पण स्त्री सुलभ मस्तर असावा.
आपण सुधा कृष्णा वर राधिके इतकेच किवा जास्तच प्रेम करतो,कृष्णाचे
प्रेम आपल्यावर आहे,पण हृदयात राधिके साठी खोलवर रुजलेले भाव का?
असा प्रश्न ती सतत कृष्णास करत असे,त्याच प्रश्नाचे उत्तर एकदा मुरलीधरा ने
एका प्रसंगातून दिले.
हे श्री कृष्णा,जगता च्या पालनहारा
उत्तर हवे मजला,विचारी रुख्मिनि
राधिकेशी इतका स्नेह का असावा
मोह माझा करावा,मी तुझी अर्धांगीनी
मनात मी,हृदयात राधिका दिसली
का असा दुरावा,मी तुझी धारिणी
मिश्किल हसे कृष्ण,काही ना वदला
पाहून रुख्मिनि कडे कापिली तर्जनि
रक्त गळे थेब थेंब ,साचले अश्रू ...
प्रेम सागरात् भीजलेत् सगळे
तरी म्हणती प्रेमास अंधळे
पाउल ठेवा जपूनी जरा तुम्ही
उघडे असुदेत सतत ते डोळे
प्रेमात स्वतः ला विसरून जाणे
फक्त दुसर्या साठी मग जिणे
जेव्हा ओथम्बुन वाहते घागर
एक मेकांचे नंतर मोजति उणे
कोणावर प्रेम करण्या पूरवी
आधी स्वतः वर प्रेम करावे
ह्याच सुंदर गुलाब पुष्पानी
दुसरे ...