नक्षी
मन आरशया चे आंगण
त्यात दिसे हृदय गीता चे स्पंदन
भावनांची झालर त्याला
असावे विश्वासचे कुंपण
स्मित हास्याची प्राजक्ता उधळावी
कधी फक्त अबोली
सप्त सुरानी सजलेली
तेवत ठेवावी समई
वार्या ची फुंकर
असावा चार हातांचा आधार
प्रेमा च्या ताटा भोवती
मोहक शब्दांच्या रांगोळीने
काढावा सुबक नक्षी चा आकार…. ...
उष्णता,आद्रता,घालमेल भावनांची
का होतेय आज मनात इतकी
कशा साठी तळाशी साचलेल्या
विचारांची उत्क्रांती होतेय पुनष्प
परत तीच चाहूल लागतेय
दूर गेले होते ना मी जिच्या पासून
मग का धावताहेत तेच विचार परत परत
प्रकाशाच्या गतीने,माझ्या दिशेने
बंद केलेल दार ठोठावत आहेत
निघून जा,नकोय मला तुमची संगत
अश्रू संपलेत सगळे माझ्या तळ्यातले
माझ विश्वच बदलय मी आता
तुम्हाला थारा नाही या ठिकाणी
मागे फिरा,बस तुमच भ्रमण सपलय
उद्वेग शिथिल होतो आहे दिसतय
मनाला काबूत ठेवण्याच काम मी कर शकेन का?
हा लावा खरच शांत झालाय? ...
घरटे बांधले तुला
इवलसा चिमना जीव कुठे ग लपला
माझ्या अंगानातला चिवचिवाट कुठे हरवला ?
पुर्वी असायची किती लगबग,किलबिल
चिमनी आणि चिमन जोडीने बसायचे
चालायची थोडी कुजबुज,थोडे प्रेमाचे हितगुज
कधी आपसात कधी माझ्याकडे पाहून हसायचे
झाले तुझे काम,दाणा नाही ठेवलस अजुन
म्हणून विचारायचे ,लटकेच रागवायचे
दाण्याचा नाश्ता करून जायाच असायच
दिवसभर फिरून काम करायाच
लहानसे तिनके,काड्या,कापुस आणून
स्वतःच टुमदार घरट वीणायच
वेळ आली की अंडी उबवायची,पिल्ल निघायची
किती उब होती न तुझ्या घरट्यात,प्रेमाची,मायेची.
त्यातली थोडी उब मला सुद्धा मिळायची
किती गर्व होता तुला पिल्लानवर
सुरेख आहेत म्हणून शंभरदा सागायचिस
मला लागल खुपल तर विचारपूस करायचिस
अगदी आपल्या माणसा सारखी काळजी
दिसायची न मला तुझ्या डोळ्यात,हावभावात
अगदी जिव्हाळ्याच नात होत,तुझ,माझ आणि पिल्लान्च
सुख दुख आपल होत न अगदी एका घरच
मग आता ग काय झाल,कुठे बिनसल
माझ मायेच पाखरू कुठे अचानक उडाल ?
असताव्यस्त झालय घरट,रिकाम झालय माझ घर
निरव शांतता,काळजात रुतनारी
खोल वर भेदलय मनाला असा बोचरा शुकशूकाट
परत हवाय मला तो ओलावा,तो गोंधळ
माझ्यावर ...