RSS Feed मध्ये सापडलेले ब्लॉग जेव्हा लिहीले गेले त्या क्रमाने इथे शॄंखलेत दाखविले जात आहेत. त्या ऐवजी ते ज्या क्रमाने सापडले, त्या क्रमाने दाखविले जावेत.
उदाहरणार्थ, अमित कुलकर्णी यांच्या ब्लॉगवरचे "नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ.." शीर्षकाचे पोस्ट ५/६ तासांपूर्वीच इथे दिसू लागले. त्यापूर्वी लिहीले गेलेले विसोबा यांचे "झाशीची राणी" हे पोस्ट आत्ता ५ मिनिटांपूर्वी इथे दिसू लागले. पण मग विसोबांच्या पोस्टची एण्ट्री अमितच्या पोस्टच्या खाली दिसू लागली!
विसोबांनी पोस्ट कधी लिहीले यावरून क्रम ठरवण्या ऐवजी, त्यांचे पोस्ट आपल्या साईटला कधी सापडले यावरून क्रमवारी ठरवली, तर वाचकांना ताजी पोस्ट्स सर्वात वर दिसतील, आणि जास्त खोलात शोधत बसावे लागणार नाही.
(पूर्वीच्या व्हर्जन मध्ये हा प्रॉब्लेम कधी दिसला नव्हता, असे वाटते.)
फीड मधील मांडणी बदलू
राजेश,
सुरुवातीच्या काही काळामध्ये संकेतस्थळावरील सगळेच ब्लॉग प्रकाशित झाले नव्हते. विसोबांच्या ब्लॉगला पहिली भेट त्यायला उशीर झाला (हा तांत्रिक बिघाड तुम्ही दुसऱ्या ठिकाणी निदर्शनासा आणून दाखविल्याप्रमाणे RSS Feeds संथ करत होता. ती अडचण आता दूर व्हायला हवी).
असा प्रकार घडला तर फार क्वचितच. त्यामुळे Feed मध्ये कधी लिहिल्या गेले ह्या वेळेनुसार सध्याच्या मांडणीमुळे जास्त फरक पडायला नको.
तरीही तुम्ही दिलेल्या सूचनेचे स्वागत आहे आणि त्याप्रमाणे बदल नक्की करण्यात येतील.
- सहाय्यक
फीडमध्ये बदल केलेत
राजेश,
तुम्ही सुचवल्याप्रमाणे फीडमध्ये बदल केले आहेत. फीडमधील क्रमवारी आता त्या पोस्ट 'मराठी ब्लॉग विश्व'ला कधी सापडल्या त्यावरून ठरवण्यात येईल. कृपया ह्या कार्यक्षमतेमध्ये काही काम करत नसल्यास आम्हाला जरूर कळवा.
- सहाय्यक.