देवनागरी
Roman
Press F12 to toggle

राजीव उपाध्ये यांची चिन्तनिका

अनुदिनीकार/प्रेषक: Rajeev Upadhye
ब्लॉग पत्ता: http://rajeev-upadhye.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

एका चर्चासत्राच्या निमित्ताने... शनिवार, २७ डिसेंबर २००८, १०:२३ (+०५:३०)

पपरवाच पुण्यातल्या एका नामवन्त वधूवर-सूचक मंडळाने आयोजित केलेल्या एका चर्चासत्राला उपस्थित राहिलो होतो. चर्चासत्रासाठी एक ज्योतिषी व एक डॉक्टरीण बाई आमंत्रित म्हणून उपस्थित होते.

या चर्चेत आयोजकांनी विवाह जुळवणे ही सामाजिक समस्या कशी बनते ही बाजू मांडली. विवाहाच्या आरोग्यविषयक शंकांचे समाधान डॉक्टरीणबाईनी केले. याशिवाय लग्न जुळण्यात पत्रिकेचे असलेले अनन्यसाधारण ...

गोत्र गुरुवार, ११ डिसेंबर २००८, १६:३६ (+०५:३०)

परवाच एका साखरपुड्याच्या समारंभाला जाण्याचा योग आला. तेव्हा लांब बसून
त्रयस्थपणे गुरुजी करवून घेत असलेले विधी पहात व ऐकत होतो. मी अमुक गोत्राचा
तमुक कुलोत्पन्न असा-असा संकल्प सोडतो या अर्थाची संस्कृत वाक्ये गुरुजी
उच्चारत होते. संपूर्ण विधीमध्ये या घोषणे पलिकडे गोत्राला काही स्थान नव्हते.
मग गोत्राशिवाय संकल्प करता येत नाही असे मानयचे का? तसं असेल तर ते कोणत्याही ...

सन २००९ मधल्या अमावस्यांचे शुभाशुभत्व मंगळवार, ०९ डिसेंबर २००८, १६:०४ (+०५:३०)

सन २००९ मध्ये खालील तारखाना अमावस्या होत असून त्यांच्या शुभाशुभत्वासंबंधी
मार्गदर्शन केले आहे. जिज्ञासूंनी त्यांचे आपल्या पत्रिकेसंदर्भातील महत्त्व
ठरविण्यासाठी ग्रहांचे सायन अंश पहावेत.

टीप - "प्रभावित व्यक्ती"ची व्याख्या - गोचर ग्रह पत्रिकेतील ग्रहांशी युति,
प्रतियुति, केंद्र, अर्धकेंद्र, नवपंचम, आदि योग करीत असतील तर त्या व्यक्ती
"प्रभावित" मानल्या जाव्यात.

२६ ...

आपले नवे मुख्यमंत्री शनिवार, ०६ डिसेंबर २००८, १७:४७ (+०५:३०)

महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून श्री. अशोक चव्हाण यांची
निवड/नेमणूक झाली आहे. त्यांची जन्मतारीख २८ १० १९५८ अशी वृत्तपत्रात छापून आली
आहे. नुसती जन्मतारीख जेव्हा ठाऊक असते तेव्हा देखिल जातकाच्या भवितव्याबद्दल
बरेच मार्गदर्शन पत्रिकेतून मिळू शकते.

पत्रिकेला uniqueness देणारे चंद्र, लग्न आणि दशमभाव आरंभबिंदू हे अशा वेळी
विचारात घेता येत नाहीत.

चव्हाण यांच्या ...

सुसंस्कृत भारतीय रविवार, ३० नोव्हेंबर २००८, १२:४१ (+०५:३०)

मला कधि कधि स्वत:ला भारतीय म्हणवून घ्यायची लाज वाटते. तुम्हाला नक्कीच
प्रश्न पडेल की हा असा का बोलतो आहे.

मी पुण्यात जीथे राहतो तिथे जवळच ३-४ मंगल कार्यालये आहेत. मी हा मजकूर लिहीत
असताना रस्त्यावर एका लग्नाची एक वरात वाजत गाजत चालली आहे. अधूनमधून
फटाक्यांचे मोठे सर लावले जात आहेत. कुण्या धनदांडग्याच्या घरचा हा विवाह सोहळा
असावा. जणू काही घडलेच नाही असा माहोल आहे. शहाण्या ...

जुनी दारू आणि नवी बाटली... बुधवार, २६ नोव्हेंबर २००८, १३:०२ (+०५:३०)

ज्योतिष शास्त्र आहे की नाही यावर वाद घालून धूळ उड्वत बसण्यापेक्षा ज्योतिष
उपयुक्त आहे की नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे. उपयुक्ततता सिद्ध होण्यास
शास्त्रीयत्वाच्या कसोटीची गरज नाही, फक्त अनुभव पुरेसा आहे. मागे एकदा आय आय
टी मधल्या प्राध्यापक जोगांनी लोकसत्तेमधल्या एका लेखाचा संदर्भ दिला होता.
लेखकाचे नाव आठवत नाही, पण त्यातील शेवटचे वाक्य माझ्या लक्षात राहिले आहे. ते ...

शनि-हर्षल प्रतियुतीच्या छायेतील त्रासदायक ग्रहयोग सोमवार, २४ नोव्हेंबर २००८, १६:४६ (+०५:३०)

शनि-हर्षलप्रतियुतीच्याछायेतीलत्रासदायकग्रहयोग

आगामी काळात म्हणजे १२ डिसेंबर ०८ व २६ जाने २००९ रोजी अनुक्रमे पौर्णिमा आणि अमावस्या हे दोन जोरदार चांद्रयोग होत आहेत. हे दोन्ही योग शनि-हर्षल प्रतियुतीच्या छायेत होत असल्याने तीव्र फलदायी ठरतील असे भाकीत वर्तवणे योग्य ठरेल. यापैकी ही पौर्णिमाअशुभ (त्यामुळे कोणत्याही नव्या सुरुवातीस ती वर्ज्य
आहे) असून, अमावस्येला ...

[शनी-हर्षल प्रतियोग] दीर्घकाल टिकणारे अस्थैर्य शुक्रवार, १० ऑक्टोबर २००८, ०८:४४ (+०५:३०)

शनी-हर्षल प्रतियोग - दीर्घकाल टिकणारे अस्थैर्य

आगामी काळात म्हणजे नोव्हेंबर ०८ ते ऑक्टोबर १० या जवळजवळ दोन वर्ष शनी व हर्षल
हे दोन मंदगती ग्रह मार्गी व वक्री गतीने पाच वेळा प्रतियुति हा जोरदार योग
करीत आहेत. सायन राशीचक्रामधिल १८ अंश कन्या ते १ अंश तूळ, १८ अंश मीन ते १ अंश
मेष, १८ अंश मिथुन ते १ अंश कर्क तसेच १८ अंश धनु ते १ अंश मकर हे मॊठे क्षेत्र
या प्रतियोगानी प्रभावित झाले ...

|| धर्मांतर || शुक्रवार, १२ सप्टेंबर २००८, १२:४२ (+०५:३०)

धर्मांतर

राजीव उपाध्ये - सप्टेंबर २००८

धर्मांतर हा माझ्या कुतुहलाचा विषय आहे. त्यात हिंदूचे धर्मांतर हा तर विशेष
कुतुहलाचा विषय. हिदूंना वाटत असलेल्या धर्मांतराच्या चिंतेची मला नेहमीच गम्मत
वाटत आली आहे.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ते गणेशोत्सवाचे दिवस होते. पुण्यातील एका
मानाच्या गणपतीतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात एका विद्वानाचे "धर्मांतराची
समस्या" या ...

कथा दोन साधुंची सोमवार, ०८ सप्टेंबर २००८, १७:५९ (+०५:३०)

कथा दोन साधुंची

डिसेंबर २००७

राजा विक्रमादित्याने आपला हट्ट काही सोडला नाही. त्याने झाडावरचे प्रेत आपल्या
खांद्यावर ऒढून घेतले आणि तो स्मशानाचा रस्ता चालू लागला. राजाच्या चिकाटीने
प्रभावित होऊन प्रेतामधला वेताळ मानवी वाणीने बोलू लागला आणि म्हणाला, "राजा
तुझ्या जिद्दीचे मला खूप कौतुक वाटतॆ. तुझे कष्ट थोडेफार हलके व्हावेत म्हणून
मी तुला एक गोष्ट सांगतॊ."

"आटपाट नगर ...