देवनागरी
Roman
Press F12 to toggle

" सागर तरंग " माझ्या कविता

अनुदिनीकार/प्रेषक: Sagar
ब्लॉग पत्ता: http://sagartarang.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

प्रेमाचा अधिकार बुधवार, १७ डिसेंबर २००८, २०:१३ (+०५:३०)

प्रेमाचा अधिकार
कधी काळी होता
तेव्हा चूक केली
आणि फक्त पश्चातापच उरला
कर्तव्याचा संसारसुरु झाला पण,
विस्मरण झाले की
आता प्रेमाचा अधिकार
उरला नाही आपल्यापाशी
जपावे घरकुल
सांभाळावा संसार
तेच विश्व झाले माझे...
थोडेसे स्थिरावलो संसारात अन्
परत एकदा,
हृदयातील प्रेमाला एक कोवळा
अंकुर फुटला
नकळतच
तसेही प्रेम कोणी ठरवून करत नाही
पण हळू हळू
त्या ...

एवढी दया नको रे दाखवू... शुक्रवार, २३ मे २००८, १८:१६ (+०५:३०)

१३ मे, २००८ ला जयपूरला बाँबस्फोट झाले
त्याच शोकांतिकेतून मनात उमटलेली ही कविता....
खरेतर ही कविता नाही... भावना आहेत.... त्यातून समाजप्रबोधन झाले आणि लोकांनी कोणाला जवळ करावे ....करु नये याचा बोध घेतला.... तर ती अतिरेक्यांच्या कारवायांना बळी पडलेल्या प्रत्येक आत्म्याला श्रद्धांजली असेन.

हे देवा,
एकच मागणे तुझिया चरणी
एवढी दया नको रे दाखवू...

होवोत अजुनि स्फोट, वाहोत ...

सरिता मंगळवार, २५ मार्च २००८, १५:१४ (+०५:३०)

सरिता येथे सागरमय होते

सर्वस्व अर्पून प्रेमा ...

का अधर तुझे हे थरथरले ... गुरुवार, १४ फेब्रुवारी २००८, १८:५८ (+०५:३०)

प्रेमधारांत चिंब भिजवुनि मजला
का नयन तुझे हे लाजले....
ओढ याच दिसाची तुजला
का अधर तुझे हे थरथरले ...
- ...

व्हेलेंटाईन डे स्पेशल गुरुवार, १४ फेब्रुवारी २००८, १८:५६ (+०५:३०)

वर्षाव प्रेमाचा आज व्हावा
असा दिवस हा अति खास व्हावा
बघुनि आपले प्रेम ते ...
स्वर्गातुनि व्हेलेंटाईन ...

तुझ्या भावनांची शपथ आहे गुरुवार, ०७ फेब्रुवारी २००८, १६:२९ (+०५:३०)

तुझ्या भावनांची शपथ आहेनाहीतर शब्दांचे हे बंध कधीच मी मानीत नाही
आज तू मला रोखले आहेनाही तर तुझा दुरावा मनाला पटत नाही
आज तुझा आधार आहेनाहीतर कोसळल्यावर मी कधीच सावरत नाही
म्हणूनच सखे, आपला ...

तुझ्या डोळ्यांचा थांग घेताना शुक्रवार, २१ डिसेंबर २००७, १९:४० (+०५:३०)

तुझ्या डोळ्यांचा थांग घेताना
मीच अथांग होऊन जातो...

तुझ्या हसण्याचा आनंद घेताना
मीच आनंदून जातो ...

तुझ्या गुंतण्याचा आवेग पाहताना
मीच गुंतून जातो ...

तुला स्वप्नांमध्ये ...

पाखरु : भाग १ (कवितासंग्रह) शुक्रवार, २१ डिसेंबर २००७, १९:१८ (+०५:३०)

प्रियकराला प्रेयसीपासून तोडून दूर कोठेतरी पाठवले... तेव्हा प्रियकरास पक्ष्याकडे पाहून त्याची आणि आपली अवस्था सम वाटली...त्या अवस्थेचे वर्णन म्हणजे हा पाखरु कवितासंग्रह.... या संग्रहाचे विशेष म्हणजे सर्व कविता या एकाच ...

जलसमाधी ... सोमवार, १२ नोव्हेंबर २००७, १६:५६ (+०५:३०)

क्षितीजावर सूर्योदय होत असताना
त्याच्या तेजाने डोळे दिपत असताना
माणसाला कुठलेच भान राहात नाही
त्या तेजस्वी सूर्याकडे तो आवेगाने झेप घेतो
पण, झेप घेताना एक गोष्ट मात्र तो विसरतो
की, खाली अथांग सागर पसरलेला आहे