देवनागरी
Roman
Press F12 to toggle

वेदश्री

ब्लॉग शिर्षक: वेदश्री
अनुदिनीकार/प्रेषक: वेदश्री
ब्लॉग पत्ता: http://vedashri.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

आश्रमानुभव शुक्रवार, २५ एप्रिल २००८, १३:४४ (+०५:३०)

वृद्धाश्रमांमध्ये जाऊन तिथल्या आजीआजोबांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे, व्यसनमुक्त होऊ इच्छिणाऱ्यांना मदत करणे किंवा कुठल्या रक्तदान शिबिरात भाग घेणे तर कधी पोलिओ लसीकरणाच्या कार्यक्रमात भाग घेणे असे माझे उद्योग हेच काय ते माझे सो कॉल्ड समाजकार्य होते. या सगळ्या उचापतींनी बाकी काही नाही तरी चांगल्या गोष्टी करण्यासाठी इतरांना बऱ्यापैकी उद्युक्त करू शकते असा विश्वास ...

शेवटची हाक शुक्रवार, २५ एप्रिल २००८, १३:४३ (+०५:३०)

"नीलू, मला उद्या एका मिटींगसाठी दिल्लीला जायचे आहे, तुला चलायचं असेल तर तूही चल. तसंही तुला तुझ्या मैत्रिणीच्या लग्नाला जायला जमलं नव्हतं ना.. मग याच निमित्ताने तिला भेटून पोटभर गप्पा मारता येतील तुला. "

रितेशचं हे बोलणं ऐकून मनात एक अनामिक उत्साह संचारला. माझी सगळ्यात आवडती मैत्रिण-अर्पिता. कधी एकदा तिला भेटते असं झालं मला. तिच्या नवऱ्याबद्दल अधिक जाणून घेण्याची जबरदस्त ...

प्रथमं वक्रतुंडंच... शुक्रवार, २५ एप्रिल २००८, १३:३६ (+०५:३०)

माझी एकाग्रता (?!) म्हणजे एक न उकललेलं कोडं आहे माझ्यासाठी. कधीकधी काहीच न ठरवता हाती घेतलेल्या कामात पूर्ण एकरूप होऊन जाऊन अत्यंत झकासपणे हातावेगळं करून मोकळी होऊन जाते तर कधीकधी नाही तर नाहीच सूर जुळत. नक्की काय केल्याने मन एकाग्र होतं आणि काय केल्याने नाही, हे मी शोधायच्या कधीच फंदात पडले नाही हे मात्र अगदी खरं आहे.

हे असं सगळं असूनदेखील आज जेव्हा सकाळी वसतिगृहात बसवलेल्या ...

हरवलेलेसे काही शुक्रवार, २५ एप्रिल २००८, १३:३५ (+०५:३०)

"पीहू.. अगं ए पीहू.." पेपर वाचतावाचता नीलने मारलेली ही तिसरी हाक ! काम सोडून काय म्हणतोय ते बघायला जावंच लागलं.
"काय रे काय झालं? काय आरडाओरडा लावला आहेस?"
नील अगदी उत्साहात म्हणाला,"अहो राणीसाहेब, तुमच्याच आवडीची गोष्ट आहे. गावात एका मोठ्या चित्रकाराच्या चित्रांचं प्रदर्शन लागलं आहे. चलणार का बघायला?"
"वाह ! का नाही? यात विचारायचं ते काय? आजच जाऊयात. अरे पण त्या चित्रकाराचं नाव तर ...

.. आणि मी पैज जिंकली ! शुक्रवार, २५ एप्रिल २००८, १३:३० (+०५:३०)

माझे जुने मेल्स चाळताना हा मेल सापडला आणि आमच्या पत्रकट्यातल्या या लाजऱ्या दोस्ताचं हे दिलखुलास मनोगत इथे सर्वांसमोर ठेवावंसं वाटलं, म्हणून हा लेखप्रपंच. त्याने केलेले अनुभवकथन जसेच्या तसे इथे लिहित आहे ( काळ्या अक्षरात लिहिलेला सर्व भाग 'चिंटूच्या काका'ने लिहिलेला आहे ). हा उपद्व्याप करण्याआधी त्याची पूर्वपरवानगी घेतलेली नाही .. पण तो आक्षेप घेईल असं वाटत नाही. चिंटूचे काका ...

प्रतिसाद देण्यातला आनंद शुक्रवार, २५ एप्रिल २००८, १३:२९ (+०५:३०)

लहानग्या राजूच्या शाळेत आज शालेय नाटकात भाग घेण्यासाठी निवड करण्यात येणार होती. राजू आणि त्याच्या वर्गमित्रांनीही नाटकात काम करायला मिळावे म्हणून हिरीरीने त्यात भाग घेतला होता. त्याची आई - सरला, तिला माहिती होतं की राजूची किती जबरदस्त इच्छा आणि अपेक्षाही आहे की त्याला निवडलं जावं नाटकासाठी, जसं भाग घेतलेल्या इतर सर्वांनादेखील वाटत असणार. कदाचित त्यामुळेच की काय तिला थोडीशी ...

कर्ज शुक्रवार, २५ एप्रिल २००८, १३:२६ (+०५:३०)

हे घरी आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जबरदस्त ताण आणि चिंता दिसत होती. त्यांचा चेहरा बघून माझ्या मनात नाहीनाही ते विचार यायला लागले. घाबऱ्या आवाजात मी विचारलं,"काय झालं? सगळं ठीक तर आहे ना?"
"ह्म.." उतरलेल्या चेहऱ्याने उत्तर मिळालं होतं.
"मग तुम्ही इतके चिंतातूर का दिसत आहात?"
"अम्म.. काही नाही.. असंच.."

दुसऱ्या दिवशी बातमी कळली की ताईंना परत हृदयविकाराचा झटका आला आहे. हा दुसरा ...

दगाबाज मैत्रिण शुक्रवार, २५ एप्रिल २००८, १३:२३ (+०५:३०)

रायगडमधल्या आमच्या छोट्याशा गावात जिकडेतिकडे एकच चर्चा होती.. आस्थाच्या नवऱ्याच्या खुनाची. मला चीड येत होती ती याबद्दलच्या लोकांच्या आपापसातल्या कुजबुजण्याची. तिची मैत्रिण म्हणून मला समजलं असतं ना ते काय बरळतायत तर मग मी त्यांना सरळ केलं असतं.

आस्था तर पुरतीच मोडली होती. "मंजिरी, जर तू नसतीस..", माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडत ती," तर मी वेडीच झाले असते. गावातल्या सर्वच जणांना ...

नको ते धुम्रपान... शुक्रवार, २५ एप्रिल २००८, १३:१६ (+०५:३०)

"मे आय कम इन सर?"
"येस."
"सर, आय विल नॉट टेक मच ऑफ युअर टाईम. आय जस्ट वाँटेड..."
"बसून बोललीस तरी चालेल तू."
प्रोजेक्ट मॅनेजर मराठीत बोलल्याने स्वरुपाला खूप बरं वाटलं.
"सर, मला प्रोजेक्ट बदलून हवा आहे."
"अच्छा. कोणाच्या प्रोजेक्टमध्ये आहे तुला इंटरेस्ट?"
"सर, पण मला प्रोजेक्ट का बदलून हवा आहे ते नाही का विचारणार तुम्ही मला?"
"कारण मला माहिती आहे म्हणूनच विचारतो आहे की ते कारण ...

पारख मनांची - १ शुक्रवार, १९ जानेवारी २००७, १२:१२ (+०५:३०)

१२ ऑक्टोबर २००५, दसऱ्याचा दिवस. आदल्या दिवशीच्या १ पर्यंत चाललेल्या दांडियाने जब्बरी थकलेलो सगळेजणं. सगळेजणं म्हणजे मी आणि माझ्या रुपा ( रूम पार्टनर ) प्रिताश्री, रत्तिका आणि विनया. तिघीही दाक्षिणात्य पण वेगवेगळ्या ...