संकेतस्थळाचे नवे रूपडे आवडले. आता पहिल्यापेक्षा हे संकेतस्थळ जास्त सुटसुटीत झाले आहे.
आवडलेल्या गोष्टी : RSS ची सोय, वर्गीकरण, चर्चासत्र
१) RSS ची सुविधा...या सोयीमुळे प्रत्येक अनुदिनीवर जाऊन लेख वाचायची गरज नाही. शिवाय प्रत्येक अनुदिनी सुध्दा मला गुगल रीडर वर सबस्क्राईब करायची गरज नाही. फक्त याच संकेतस्थळाला स्बस्क्राईब केलं की काम झालं.
२) वर्गीकरण......सगळ्या अनुदिन्यांच्या लेखांना असलेल्या ’शब्दखुणां’ वरून
(tags) जे वर्गीकरण केलं आहे त्याला तर तोड नाही. पण या पानावर ’सर्च’ ची सोय असायला हवी. आणि ती ही मराठीतून शोध घेण्याची. कारण वर्गीकरणाची यादी फारच मोठी आहे.
३) गेले काही महीने माझ्या अनुदिनीवरच्या नोंदी मला या संकेतस्थळावर दिसत (ताज्या नोंदी) नव्हत्या. त्याचे कारण कळू शकेल का ? माझी अनुदिनी आहे http://majhimarathi.wordpress.com
४) चर्चासत्राची विषयवार विभागणी सुध्दा चांगली सोय आहे. परंतु काही कालावधी उलटून गेला की त्याची लंबावळ तयार होते. तेव्हा त्यावर वेळीच उपाय शोधायला हवा.
तूर्तास इतकेच पुरे. अजून चाचणी चालू आहे.
रंगसंगती
रंगसंगती आवडली. अजून सुधारणा अपेक्षित.
~ मनस्वी
धन्यवाद majhiduniya!
तुमच्या चाचणीमुळे आम्हाला आणखी सुधारणा व त्रुटी शोधायला मदत होईल त्यामुळे त्या सगळ्या कळू देत.
तुमचा माझीमराठी हा ब्लॉग बऱ्याच इतर ब्लॉगांप्रमाणे जुन्या संकेतस्थळावरील तांत्रिक त्रुटींमुळे दाखविण्यात येत होता. त्या सगळ्या चुका दुरुस्त झाल्या आहेत. तुमच्या नवीन नोंदी आता ह्या संकेतस्थळावर पूर्ववत सुरू होतील.
चर्चासत्रांविषयी अजून ते वेळ यायची आहे. सध्या फार तर दोन विषय चर्चिले जात आहेत. वेळ आली की त्यातही बदल करावे लागणार हे निश्चित.
- सहाय्यक.
लंबावळ
हो, लंबावळ होणारया गोष्टी hard-coded च असाव्यात असे मला वाटते.
~ मनस्वी
Limits are there!
मनस्वी,
एखादा विषय भरपूर चर्चिला गेल्यावर प्रतिसादाची लंबावळ तयार होणारच. ते प्रतिसाद त्या विशिष्ट चर्चेमधील असल्यामुळे तेसुद्धा इकडे तिकडे हलवता येणार नाहीत. हा, एका पानावर किती चर्चेचे विषय आणि किती प्रतिसाद दिसतील याबद्दल मर्यादा अगोदरच आहेत. बाकी कुठल्या "Hard-Coding" ला तुम्ही उद्देशून बोलता आहात कृपया याबद्दल जरा अधिक समजावून सांगाल काय?
- सहाय्यक.
hard coding
मी वर्गीकरणाच्या hard coding बद्दल बोलत होते.
~ मनस्वी
वर्गीकरणातील बदल
त्या वर्गीकरणाच्या लंबावळीला बघण्याकरिता सध्याची "लांब" सूची बदलवून सहजगतीने वापरण्याकरिता काही बदल लवकरच केले जातील. त्यामध्ये अगोदर येथे चर्चिल्याप्रमाणे "शोध" घेण्याची आणि वर्णाक्षराप्रमाणे मांडणी इ. गोष्टी उपलब्ध होतील. त्याला वेळ लागू शकेल, पण हे बदल निश्चितच आम्ही करू.
- सहाय्यक.
सहाय्यक,
धन्यवाद, माझ्या ब्लॉगवरच्या नोंदी पुर्ववत दिसायला लागल्या आहेत. खरं तरं माझ्या ब्लॉगचा सगळ्यात जास्त वाचकवर्ग मला ’मराठी ब्लॉग विश्व’ ने मिळवून दिला होता. गेल्या काही महिन्यांत या त्रुटीमुळे कमी झालेला वाचकवर्गाचा ओघ मलाही सतावत होता. असो, तात्काळ केलेल्या या बदलाबद्दल मनापासून धन्यवाद.
सिक्वेन्स चुकतोय.
ही प्रतिक्रिया येथे हलविण्यात आली आहे.
congratulation
ही प्रतिक्रिया येथे हलविण्यात आली आहे.
अभिनंदन
कात टाकलेले ‘मराठी ब्लॉगविश्व’ आवडले.
नवी रंगसंगती डोळ्यांना सखावते.
आपले मन:पूर्वक अभिनंदन.
ब्लॉगरांचे छायाचित्र नव्या लेखनासोबत देता आले तर उत्तम.
‘गाथा मराठी मनाच्या’
या माझ्या ब्लॉगवरील मुक्तकांची नोंद अद्यापही
मराठी ब्लॉगवर आली नाही.
ती करण्यात यावी ही विनंती.
आपला,
- डॉ.श्रीकृष्ण राऊत
धन्यवाद!
डॉ. श्रीकृष्ण राऊत,
तुम्हाला या संकेतस्थळावरील नवीन रूपरेषा आवडली हे वाचून आनंद झाला.
तुमच्या "ब्लॉगरचे छायाचित्र" सूचनेबद्दल नक्कीच विचार करू.
सध्या, कुठल्या सदस्याचा कोणता ब्लॉग आहे हा दुवा येथे अस्तित्वात नाही. ते काम पूर्ण झाले की सदस्यांना त्यांचे स्वतःचे चित्र जोडण्याची मुभा देता येईल. पण ते कार्य इतक्या लवकर होऊ शकणार नाही.
तुमचा 'गाथा मराठी मनाच्या' हा ब्लॉग आता ह्या संकेतस्थळावरील शृंखलेमध्ये जोडला आहे.
- सहाय्यक.
प्रतीसाद हवा
ही प्रतिक्रिया येथे हलविण्यात आली आहे.
साभिनंदन विनंती
वर्गीकरणांच्या TAGS आवडल्या.
‘मराठी ब्लॉगविश्वा’ला सौष्ठव लाभतंय.
अभिनंदन.
दि.२० फेब्रुवारी २००८ पासून ‘गाथा मराठी मनाच्या’ या माझ्या ब्लॉगवरील
नवीन पोस्ट ‘मराठी ब्लॉगविश्वा’ वर दिसत नाहीत.
त्याचे व्यवस्थापन करावे,ही विनंती.
-डॉ.श्रीकृष्ण राऊत
दुरूस्त केले
धन्यवाद.
नोंद जर फारच कमी शब्दांची असेल तर ती येथे दिसण्यास अडथळा होऊ शकतो. कमीत कमी शब्दांची ही संख्या आम्ही आणखी कमी केली आहे. जर ब्लॉगवर फक्त एका किंवा दोनच ओळींची नोंद असेल तर ती दिसणार नाही. मात्र चारोळ्यांना आता अडचण येऊ नये.
- सहाय्यक