देवनागरी
Roman
Press F12 to toggle

चाचणी आणि सुधारणा

१ किडा मिळाला:
मुख्यपृष्ठावरील "येण्याची नोंद करा" ह्या कळीवरील अक्षरे दिसत नाहीत.

~ मनस्वी

आहे काय हे मराठी ब्लॉग विश्व?

"मराठी ब्लॉग विश्व" हा नक्की काय प्रकार आहे, ह्याची माहिती कुठेच नाही.

(जर असेल तर सहज दिसेल अशा ठिकाणी नाही.)

त्यामुळे नवीन पाहुणा संभ्रमित होउ शकतो.

~ मनस्वी

मराठी ब्लॉग विश्व काय आहे?

मनस्वी,

आता तुम्हाला पहिल्या पानावर उजव्या बाजूला "माहिती" ह्या ब्लॉकमध्ये या संकेतस्थळावरील माहिती तसेच इतर उपयोगी लेख सापडतील.

- सहाय्यक

पुढच्या चर्चेचा दुआ

आता हा पुढच्या चर्चेचा दुआ इथे मध्येच दिसत आहे.

तो एकदम वर तरी असावा किंवा खाली तरी, असे मला वाटते.

~ मनस्वी

चर्चा आणि प्रतिसाद

मुख्य चर्चेचे प्रकाशन आणि तिचे प्रतिसाद हे २ वेगवेगळ्या format मध्ये असावे, म्हणजे चर्चा वाचताना वाचकाला विश्लेषण करणे सोपे जाईल.

~ मनस्वी

धन्यवाद!

वा मनस्वी,

सुरुवातीलाचा पुष्कळ गोष्टींवर मत दिल्याबद्दल भरपूर धन्यवाद!

तुम्हाला येणारा "कळीवरील अक्षरे दिसत नाहीत" ह्यामागील कारण काही image files लगेचच download झाली नसल्यामुळे असेल. ती अडचण अजूनही आहे काय ह्याबद्दल आम्हाला सांगा.

- सहाय्यक

अजूनही आहे.

कळ आणि त्यावरील अक्षरे दोन्ही पांढरया रंगात आहेत.

~ मनस्वी

हम्म!

तुम्ही कुठला browser आणि Operating System वापरता आहात? एखादा Screenshot आम्हाला पाठवाल काय 'admin at marathiblogs.net' ह्या पत्त्यावर? धन्यवाद!

- सहाय्यक

Screenshot पाठवला आहे

मी XP आणि IE7 वापरते.

Screenshot पाठवला आहे.

~ मनस्वी

धन्यवाद!

Screenshot मिळाले. सध्या पुष्कळ जणांकडे IE7 नसल्यामुळे त्या browser वर भरपूर चाचणी अजून झाली नाही. तुम्ही सांगितलेली अडचण IE7 वर तपासणी करून बघू. इतर जणांना कळावे म्हणून एक चित्र तुमच्या मूळच्या चर्चेच्या विषयामध्ये जोडले आहे.
- सहाय्यक

IE7 वरील त्रुटी दुरूस्त केली

नमस्कार मनस्वी,

आम्ही Internet Explorer 7 या browser वर दिसणारी पांढऱ्या कळीची त्रुटी दुरूस्त केली आहे.

तुमच्या निदर्शनाबद्दल धन्यवाद!

- सहाय्यक.

छान!

वा! अभिनंदन.

tabs

मुख्यपृष्ठावर सध्याचा lateset updated blog Ch-42:शून्याचा शोध कुणी लावला?(शून्य- कादंबरी ) हा दिसत आहे.

त्याच्या खाली लगेचच काही tabs दिसत आहेत. त्यावर टिचकी मारून पाहिली. त्यातून काय साध्य होते हे निश्चित कळले नाही.

हे tabs सर्वात वरती असायला हवेत काय? कारण ते फक्त पहिल्याच ब्लॉगखाली दिसतात.

शिवाय tabs च्या UI मध्येही त्रुटी दिसल्या.

उदा. marathi cineshrusthi हा ब्लॉग दोन्ही ओळी खात आहे.

~ मनस्वी

टॅग्ज किंवा शब्दखूणा (वर्गीकरण)

त्या टॅब्ज म्हणजे त्या नोंदीच्या वर्गीकरणासाठी अनुदिनीकाराने दिलेले टॅग्ज आहेत. सध्या शून्यच्या अनुदिनीकारांनी यावर भरपूर वर्गीकरण जोडले आहे त्यामुळे त्या नोंदीवर UI तुटू शकतो. हे IE7 मध्ये कसे दिसते हे अजून बघायचे आहे.

तुम्ही खाली 'वदनी कवळ घेता' ह्या ब्लॉगवरील 'फ्लॉवर चटपटा' ह्या नोंदीवर बघाल तर तिथे सुद्ध तुम्हाला तीन टॅग्ज दिसतील. त्यावर समजा तुम्ही 'रोजचे पदार्थ' ह्या शब्दखूणेवर टिचकी दिलीत तर तुम्हाला त्या सगळ्या नोंदी दिसतील ज्यावर अनुदिनीकाराने 'रोजचे पदार्थ' हा टॅग वापरला आहे. तसेच पुढे जाल तर 'कृष्ण उवाच' मध्ये 'गोष्ट' हे एक वर्गीकरण केले आहे. त्यावर टिचकी दिल्यावर .... तुम्हाला आता कळले असेल.

- सहाय्यक.

वर्गीकरणाची परवानगी

एकाच वेळी १०० वर्गीकरणे जोडणे illogical वाटते.

ही वर्गीकरणे तयार करण्याचे अधिकार कोणाला आहेत.

ते एकालाच असावेत असे वाटते. नवीन वर्गीकरण हवे असल्यास त्याची विनंती admin कडून अधिकृत व्हायला हवी.

अन्यथा भरमसाठ वर्गीकरणे तयार होतील.

"वर्गीकरणाची परवानगी" तर्कसंगत असेल असे मला वाटते.

~ मनस्वी

वर्गीकरण

सध्या त्या त्या ब्लॉगांवर होणारे वर्गीकरण जसेच्या तसे येथे दाखविले जात आहे. हे वर्गीकरण करणारे ब्लॉगलेखक/लेखिकाच आहेत. हे मात्र सत्य की काही ठिकाणी ह्या शब्दखूणांचा गैरवापर होतो. सध्या ह्यावर काही उपाय नाही.
एक उत्तर आहे की मर्यादितच वर्गीकरणात्मक टॅग्ज‍ दाखवावेत. म्हणजे जर २० शब्दखूणा जोडल्या असतील तर त्यापैकी पहिल्या ५च दाखवव्या. पण मग त्यामध्ये योग्यच वर्गीकरण दिसेल काय त्याबद्दल शंका आहे.

दुसरा उपाय म्हणजे संकेतस्थळावर आलेल्या सद्स्यांनाच ते वर्गीकरण संपादित करण्याची मुभा द्यावी. यावर पुढे कार्य करता येईल.

- सहाय्यक

"Cancel" कळ

प्रतिक्रियेचे संपादन करताना किंवा प्रतिसाद देताना २ कळी दिसतातः

१. प्रतिक्रिया पडताळून बघा

२. प्रतिक्रिया द्या

ह्याचबरोबर "Cancel" कळ हवी असे मला वाटते.

~ मनस्वी

slowww RSS Feeds

This comment has been moved here.