मुंजीच्या दिवशी मात्र भल्या पहाटे उठून कामाची लगबग सुरू झाली. मुंज्या मुलांना उठवून तयार करण्यात आले. त्यांचे मातापिता, करवल्या वगैरे अतिविशिष्ट मंडळींना सगळ्याच कामात अग्रक्रम देणे आवश्यक असल्यामुळे आम्ही इतरेजन आपला नंबर लागण्याची वाट पहात आराम करीत राहिलो. अखेर जमेल तेंव्हा जमतील तेवढी नित्याची कामे उरकून कपडे चढवून तयार होईपर्यंत मातृभोजनाची तयारी सुरू झाली होती. ...