देवनागरी
Roman
Press F12 to toggle

जास्वंदाची फुलं

ब्लॉग शिर्षक: जास्वंदाची फुलं
अनुदिनीकार/प्रेषक: Jaswandi
ब्लॉग पत्ता: http://jaswandi.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

Schizophrenia beats dining alone! - Oscar Levant मंगळवार, २३ डिसेंबर २००८, ००:४८ (+०५:३०)

मी कधीपासुन हेच आठवत्ये की आपण शेवटचं एकटं कधी जेवलो होतो...

schizophrenia... माहित नाही का, पण माझ्या आवडीचा विषय आहे. कॉलेजमध्ये एकदा psychology च्या project साठी हा विषय घेतला होता आणि त्यानंतर ह्यातला interest वाढत गेला. आई तर मला schizophrenic म्हणायला लागली होती मी इतक्या प्रेमाने ह्याचा अभ्यास केला होता, कधी नव्हे ते जाड-जुड पुस्तकं आणुन वाचली. project च्या नावावर देवराई, Beautiful mind, 15th park avenue, vanilla sky, woh lamhe ते अगदी बिपाशा ...

Coming soon... शुक्रवार, १२ डिसेंबर २००८, १५:५६ (+०५:३०)

बास्स म्हणजे बास्स झालं आता...
शेवटची पोस्ट ३० सप्टेंबरला टाकली होती आणि त्यानंतर काही लिहीलंच नाही इथे!
मलाच माझा राग येतोय, अनेक उत्साही ब्लॉगर्स असा ब्लॉग लिहीतात आणि काही दिवसांनी विसरुन जातात तसं झाल्यासारखं वाटतंय मला... मला ह्या ब्लॉगला मारायचं नाही आहे...

कदाचित हेच कारण ...

The end...the beginning... मंगळवार, ३० सप्टेंबर २००८, २०:०० (+०५:३०)

काही गोष्टी संपवाव्या लागतात, किंवा अर्ध्यावर सोडुन द्याव्या लागतात. कारण जेव्हा १ गोष्ट संपते तेव्हाच दुस-या गोष्टीला सुरुवात होते. cliche मारायचाच तर "प्रत्येक शेवट, एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात असते".

इथे आधी नवीन कहाण्या सुरु झाल्या आणि म्हणुन मग जुन्या गोष्टी... "hutt, I was so childish" म्हणत संपवल्या, संपवल्या म्हणण्यापेक्षा डोक्यातल्या कुठल्यातरी अडगळीच्या खोलीतल्या एका ...

सहस्त्रावर्तन शनिवार, २० सप्टेंबर २००८, ००:४५ (+०५:३०)

श्री गणेशाय नम:
हरि ओम नमस्ते...

सुरु झालं... मी बाहेरच्या खोलीत बसले होते.
मी agnostic नाही अगदी, पण confused नक्की असते ह्या सगळ्या "देव-देवता-पुजाअर्चा" बाबतीत!

गणपती सण म्हणुन मला भारी आवडतो, दिवाळीपेक्षाही जास्त... पण "आज सहस्त्रावर्तन आहे हं संध्याकाळी" असं काकूनी सांगितल्यापासुन माझा mood गेला होता. म्हणा.. गणपतीत गावाला २च दिवसांसाठी गेले होते, त्यातही एक दिवस सहस्त्रावर्तन खाणार ...

सावरी शुक्रवार, २९ ऑगस्ट २००८, २३:१५ (+०५:३०)

कॉलेजच्या संपुर्ण आवारात मिळुन साधारण ५-६ सावरीची झाडं आहेत. आत्ता सगळ्यांच्या शेंगा फुटायल्या लागल्या आहेत, त्यामुळे सगळीकडे सावरीचा कापूस उडत असतो. सावरीला शेवरी म्हणतात बहुतेक, मला नक्की माहित नाही, तर सगळीकडे हा कापूस हवेवर तरंगत असतो.

आज मी लायब्ररीमधुन परत आमच्या डिपार्टमेन्टमध्ये यायला निघाले, आणि अचानक ह्या झाडांवर नजर गेली. त्या झाडाच्या सावलीतच एक जास्वंदाचं ...

इयत्ता पहिली, पहिल्यांदाच लांब ... गुरुवार, २१ ऑगस्ट २००८, २३:०६ (+०५:३०)

इयत्ता पहिली, पहिल्यांदाच लांब कुठेतरी आई-बाबांशिवाय जाणार होते. आमच्या शाळेची ट्रीप होती शहाड-टिटवाळ्याला, जरी सकाळी जाउन संध्याकाळी परत यायचं होतं तरी खुप वेगळं वाटत होतं. आजही आई-बाबा बसपाशी सोडायला आलेले आठवताय्त. पहाटे पाच वाजता, अंधुकश्या प्रकाशात आई-बाबांचे चेहरे...त्यांच्या चेहेर-यावरचं कौतुक आणि काळजी... नाही, शब्दात नाहीच बसवता येणार तो प्रसंग... आपण जिथे जाणार आहोत ...

बंडु, पिंगी आणि आई! शनिवार, ०९ ऑगस्ट २००८, ००:१५ (+०५:३०)

"पांढरा... तिचा आवडता रंग! आणि म्हणुनच तिची आख्खी खोली पांढरीशुभ्र फक्त फ्लॉवरपॉटमधलं ते पिवळं सूर्यफुलचं काय ते वेगळ्या रंगाचं. छोटुश्या पिंगीच्या हातात असतं तर तिने सूर्यफुलही पांढरं रंगवलं असतं. खाली अंथरलेल्या फरच्या पांढ-याशुभ्र गालिच्यावर बसुन पिंगी पुस्तक वाचत होती. तिच्या शेजारी तिचा बंडु बसला होता, बंडु म्हणजे किनई तिचा "white stuffed toy" आहे. पण शूsss त्याला असं म्हंटलेलं तिला ...

आणि प्रथम क्रमांक.... शनिवार, ०२ ऑगस्ट २००८, ००:४२ (+०५:३०)

हातांची घट्ट मुठ! नाव ऐकायला प्राण कानात गोळा झालेले...
ओठांमध्ये एक हल्की थरथर, पोटात आणि छातीत काहीतरी विचित्र हालचाल...
डोळे त्या बक्षिस जाहीर करणा-या बाईकडे...
बक्षिस घ्यायला कुठून जायचं तेही ठरवलेलं...
देवा हे बक्षिस मलाच मिळायला हवं, बाजुची मुलगी माझ्याकडे बघते..मी तिच्याकडे बघुन एक स्माईल देते! मला काहीही tension नाहीये हे दाखवायचा एक असफल प्रयत्न... आणि माझं नाव ऐकु येतं...
yes! ...

कपाट-पुराण! १ (कपड्यांचं कपाट) सोमवार, २१ जुलै २००८, १९:५७ (+०५:३०)

आज अचानक "दार उघड्ल्यावर उतु जाणारं" माझं कपाट आवरायला घेतलं. कित्ती दिवसांपासुन त्यात कपडे कोंबलेले होते. घरात इतके हॅंगर पडलेले आहेत, पण आजपात्तुर त्यांचा आणि माझ्या कपड्यांचा कधी संबंध नाही आलेला. म्हणजे असेल जर मुड तर मी कपड्यांच्या घड्या घालते कधी-तरी..खोटं का बोला? पण माझ्या अंदाजाने मी कपाटाचं दार बंद केल्यावर कपडे एक्मेकांशी खेळत असावेत किंवा मारामारी करत असावेत कारण मी ...

विचीत्र! शुक्रवार, २७ जून २००८, १६:२७ (+०५:३०)

आदल्या दिवशी कविता (कामवाली) आली, थकलेली दिसत होती.
काम संपल्यावर म्हणाली "सासु खुपच आजारी पडल्ये, चमच्यानेच पाणी पाजतोय आता तिला..खुप वाईट हालत आहे"
दुस-या दिवशी सकाळी आलीच नाही कामावर... जे कळायचं ते कळलं..आता १३ दिवस बघायला नको!
रात्री कविता आली, छान शांत दिसत होती " मी आले नाही..."
मी तिला अर्धवट तोडत म्हणाले.. "हो.. आलं लक्षात, अजुन किती दिवस?"
कविता "१५ दिवस नाही येणार, गेली ...