कुणास कळते ह्रदयाची कळ
अपुले आपण असतो केवळ
असे कसे हे अपुले नाते...
मला घाव अन् तुला कसे वळ?
कुठून आणु ऊसणे मागुन
पुन्हा पुन्हा मी जगण्याचे बळ...
कितीक द्यावी स्पष्टीकरणे...
कितीक आपण काढावा पळ ?
याद माझी येत नाही हे ख्ररे का?
त्रास थोडा देत नाही हे खरे का ?
तू निघावे अन् तुला मी थांबवावे
हे तुला अभिप्रेत नाही हे खरे का ?
जाळते आहे जिवाला खूप जी,...ती
वेदना गझलेत नाही हे खरे का ?
खूप आहे आज पैसा ...पण मनाला
तो ...