हिरा ठेवितां ऐरणीं
हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ॥1॥
तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ध्रु.॥
मोहरा होय तोचि अंगें। सूत न जळे ज्याचे संगें ॥2॥
तुका ह्मणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥3॥
हिरा ऐरणीवर ठेवून त्याच्यावर घणाचे घाव घातल्यावरही जर तो फुटला नाही तरच ...