देवनागरी
Roman
Press F12 to toggle

शब्द मनातील...

ब्लॉग शिर्षक: शब्द मनातील...
अनुदिनीकार/प्रेषक: मनस्विनी
ब्लॉग पत्ता: http://shabdamanaateel.blogspot.com/index.html
ब्लॉग वर्गीकरण:

झाले मोकळे आकाश - ५ शुक्रवार, २३ मे २००८, २०:२६ (+०५:३०)

दोन दिवस तसेच गेले.शुक्रवार उगवला. अभिने ठरवले, नितूला उद्या संध्याकाळी भेटायचे. आणि सारे बोलायचे. जे काही होईल ते एकदाच होवून जाउ दे.
दुपारी चहाची वेळ झाली. अभि नितूकडे आला.
’चल चहा घेउन येवू..खूप झोप येते आहे..’
’चल... कालपण रात्री उशिरापर्यंत टिव्ही पाहिला वाटतं’, ती उठता उठता म्हणाली.
....
.
.
’तू उद्या संध्याकाळी काय करते आहेस..’
’काही नाही.. का रे?’
’मग उद्या ची ...

झाले मोकळे आकाश-४ गुरुवार, २२ मे २००८, २०:४९ (+०५:३०)

रात्रीचे जेवण एका मैत्रिणीबरोबर उरकून नितीका रुमवर आली. रेडिओ सुरु केला. मिर्चीवर ’पुराने जिन्स के पॉकेटसे’ सुरु होते. ’तुमको देखा तो ये खयाल आया...जिंदगी धूप तुम घना साया...’ जगजितजी गात होते..
नितीकाला अभिची आठवण आली. आठवायला खरतर ती विसरलीच कुठे होती त्याला? मनाच्या तळघरात त्याच्या आठवणी बंदिस्त करुन ठेवल्या होत्या... आज तो भेटला आणि त्या तळघराचे कुलूप ताडकन तुटून पडले..सा-या ...

झाले मोकळे आकाश - 3 बुधवार, २१ मे २००८, २२:३७ (+०५:३०)

आज अभि सकाळपासूनच बेचैन होता. ऑफिसची तयारी करताना ही गोंधळला होता...आईच्याही लक्षात आले..’काही नाही ग सहजच’ म्हणून तो निघालासुध्दा..आज ११.०० वाजता नितीका इंटरव्ह्युसाठी येणार होती. परवा फोनवर तिच्याशी बोलल्यानंतर ती ’नितू’च आहे याविषयी काही शंकाच नव्हती.तोच आवाज, तिच बोलण्याची ढब..
’अजूनही तशीच असेल का ती?की बदलली असेल..?’
’ओळखेल का ती आपल्याला?’ ’की विसरली असेल..?’, ’

झाले मोकळे आकाश - २ मंगळवार, २० मे २००८, २३:०३ (+०५:३०)

त्यांच्या बंगल्याशेजारच्या अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावर एक छोटा फ्लॅट होता. बरीच वर्षे तो फ्लॅट बंद होता. त्याच्या खोलीच्या अगदी खिडकीसमोर त्या फ्लॅटची खिडकी होती. त्याला कायम वाटायचं, या फ्लॅट मध्ये कोणी रहायला आले तर किती छान होईल.. अभ्यासचा कंटाळा आला की हळूच समोरच्या खिडकीतून पलिकडे डोकावता येइल..पलिकडे कोणी असेल तर मस्त गप्पा मारता येतील.. अगदीच नाहीतर टिव्ही दिसला ...

झाले मोकळे आकाश...-१ सोमवार, १९ मे २००८, २३:२० (+०५:३०)

अभि आज जरा खुशीतच होता.खुशीत असण्याचे कारण ही तसेच होते, त्याला अचानकच खूप वर्षांनी नितीकाचा शोध लागला होता!
----------------------------------------------------------------------------
अभि.. अभिजीत जोशी. एका नावाजलेल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये टीम लीडर म्हणून काम करत होता.
दिसायला स्मार्ट, आणि कामातही तितकाच हुशार. त्याच्या नेतेगिरीवर त्याच्याबरोबर काम करणारे लोक खूश असायचे. नुकताच त्याच्या प्रोजेक्टचा क्लायंट ...

रांगोळी बुधवार, १४ मे २००८, २२:४३ (+०५:३०)

मी गुढीपाडव्याला दारात काढलेली ...

आठवणी गुरुवार, २४ एप्रिल २००८, २२:३८ (+०५:३०)

मी कामात गुंतलेली असते..
अचानक
मनाच्या कुठल्याशा कप्प्यात जपलेली
एखादी आठवण खोडकर होते..
’जरा बस ना माझ्या जवळ’,
साखरपेरणी करु लागते.
मी हसते गालातल्या गालात !
तिला टप्पल मारुन,
पुन्हा कामाला लागते..
तसा तिचा खोडसाळपणा,
आणखी वाढतो..
ती हळूच, माझ्या नकळत,
मनभर फिरते..
आणखी आठवणी ...

असे काय आहे..? गुरुवार, १९ जुलै २००७, १२:०५ (+०५:३०)

सांग नजरेत तुझ्या असे काय आहे...
भेटण्यास पुन्हा नजर अनावर आहे!

सांग मौनात तुझ्या असे काय आहे...
लपवलेस जे तू, मज ऐकायचे आहे!

सांग सुरात तुझ्या असे काय आहे...
भिजले कितीक, परी मी अतृप्त आहे!

सांग स्पर्शात तुझ्या असे काय ...

आंधळे प्रेम मंगळवार, १७ जुलै २००७, १७:३३ (+०५:३०)

एका मैत्रिणीच्या अनुभवावर आधारित...
-------------------------------------

ती आणि तो..
कॉलेजमध्ये एकत्र शिकले..
ती सुंदर आणि तो हॅंड्सम,
त्याने तिला ’विचारले’
आणि तिने लाजून होय म्हंटले...

तुम्ही म्हणाल,
ह्यात काय विशेष?
हे तर नेहमीच ...