देवनागरी
Roman
Press F12 to toggle

इरावती

ब्लॉग शिर्षक: इरावती
अनुदिनीकार/प्रेषक: Iravatee
ब्लॉग पत्ता: http://iravatee.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

’माणूस’ नावाच्या प्रदर्शनातलं ते चित्र... रविवार, १६ मार्च २००८, ०४:०४ (+०५:३०)

एवढ्यात माझ्या ऑफिसचे ऍडमिन आणि त्या डिपार्टमेंट्चा लाडका ट्रॅव्हल एजंट ह्यांच्या कृपेने मला USला जाताना Heathrow Airportवर काही तास अडकून पडावे लागले. तटस्थपणे माणसे पहात बसायाची आवड आसलेल्या कोणालाही असे फलाटावर, प्लॅट्फॉर्मवर किंवा एअरपोर्टवर आडकून पडणे ही मेजवानीच असते. वेगवेगळ्या प्रकारची, वयाची,आकाराची,रंगाची तसेच वेगवेगळ्या हावभावाची इतकी ’मनुष्ये’ एकदम पहाणे ही मोठी ...

झेड(Z) ब्रिज - एक महत्वाचा कट्टा सोमवार, २५ फेब्रुवारी २००८, ००:१६ (+०५:३०)

"रावी, झेड ब्रिज वर येशील सहा वाजता? बोलायचंय" पुण्यात वीकेंडला गेलं की हमखास हे झेड ब्रिजचं एखाद्या मित्र-मैत्रिणीचं आमंत्रण मिळतंच. झेड ब्रिज हा खरंतर कट्टा नाहीच पण काहीतरी महत्वाचं वाटणारं असं बोलण्याची अनेकांची हक्काची जागा.
तुम्ही पुण्याचे नसाल तर झेड ब्रिज काय प्रकार आहे हे सांगण्यासाठी हा खटाटोप. एक अतिशय अजब डिझाईन असलेला Z आकाराचा हा नदीवरचा पूल आहे. असं ऐकलंय की हा ...

चॉकलेटची चांदी बुधवार, १३ फेब्रुवारी २००८, ११:४५ (+०५:३०)

प्रत्येकाची स्वत:ची (लहानशी का असेना) अनुभवांची पुरचुंडी असते. त्या पुरचुंडीतल्या अनुभवांवर बेतलेल्या भल्या-बुऱ्याच्या अक्षांश-रेखांशावर आपण कसरत करत असतो आणि जगरहाटीपेक्षा फारकत घेतली तरी ते ’माझे विचार’, ’मला असं वाटतं’ ...

पहिलं वहिलं मंगळवार, ०५ फेब्रुवारी २००८, २०:२६ (+०५:३०)

का लिहितियेस?...(असंच, आपलं वाटलं लिहावंस म्हणून...किंवा असं म्हणेन की वहीची पानं अबोल वाटू लागली आहेत म्हणून)

काय लिहितियेस?...(काय?...तसं रोजचंच काही-बाही, ते वहीला खरंतर माहीत असायचं पण आता interactive element आल्यामुळे पुन्हा तशी नव्यानंच ...