देवनागरी
Roman
Press F12 to toggle

bollytine

ब्लॉग शिर्षक: bollytine
अनुदिनीकार/प्रेषक: Mandar Joshi
ब्लॉग पत्ता: http://bollytine.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

review-"मान गये मुघल-ए-आझम' शनिवार, २३ ऑगस्ट २००८, २०:०५ (+०५:३०)

"शोले' आणि "जाने भी दो यारो...' या दोन अशा कलाकृती आहेत की, ज्या वारंवार तरुण निर्माता-दिग्दर्शकांच्या स्वप्नात येतात आणि त्यांना नको ते करायला भाग पाडतात. लेखक-दिग्दर्शक संजय छेल यांचा "मान गये मुघल-ए-आझम' हा सिनेमासुद्धा अशाच एका भंगलेल्या स्वप्नाची कहाणी आहे.
"मान गये मुघल-ए-आझम' या "टायटल'वरून या सिनेमाचा के. आसिफ यांच्या "मुघल-ए-आझम'शी अगदी जवळचा संबंध असेल, असं वाटण्याची शक्‍यता ...

review-मुंबई मेरी जान शनिवार, २३ ऑगस्ट २००८, २०:०३ (+०५:३०)

मुंबई... जी कधी थकत नाही आणि जी कधीही दमत नाही... असा मुंबईनगरीचा गौरव केला जातो. कधी नैसर्गिक आपत्ती असो किंवा कधी दहशतवादानं मांडलेला क्रूर खेळ असो... अनेक संकटं कोसळूनही हे शहर काहीच घडलं नसल्याप्रमाणे आजवर कार्यरत राहिलेलं आहे. हिंदी चित्रपटांमधून ही मुंबई अनेक वेळा प्रेक्षकांसमोर आली आहे, पण या मुंबईला जिवंत ठेवणारा सर्वसामान्य मुंबईकर सेल्युलॉईडद्वारे प्रभावीपणे ...

"कॉन्ट्रॅक्‍ट' review बुधवार, २३ जुलै २००८, १८:११ (+०५:३०)

हुकमाचा एक्काही कामी !
"सरकार राज'ला बऱ्यापैकी आकार देण्यात रामगोपाल वर्मांना यश आल्यानं हा दिग्दर्शक पुन्हा माणसात येतोय, असं वाटत होतं. मात्र, "कॉन्ट्रॅक्‍ट' पाहिल्यानंतर तसं काही झालं नसल्याची खात्री पटते. गेल्या काही वर्षांमध्ये वर्मांनी आपल्या चित्रपटांमधून बरेच प्रयोग केले. "गॅंगवॉर'पट सोडले तर त्यांचे बहुतेक सर्व प्रयोग फसले. "सत्या', "कंपनी'नंतर वर्मांनी ...

किस्मत कनेक्‍शन review मंगळवार, २२ जुलै २००८, १९:०७ (+०५:३०)

"लूज' कनेक्‍शन !
दिग्दर्शक अजिज मिर्झांची ओळख म्हणजे "राजू बन गया जंटलमन', "येस बॉस', "चलते चलते' हे चित्रपट. हलकेफुलके विषय आणि त्याची तितकीच हलकीफुलकी हाताळणी, हे त्यांच्या सिनेमाचं ठळक वैशिष्ट्य. "चलते चलते'च्या यशानंतर तब्बल पाच वर्षांनी त्यांनी "किस्मत कनेक्‍शन' हा सिनेमा बनवलाय. दरम्यानच्या काळात हिंदी सिनेमा खूप बदललाय. त्यांची ही विश्रांती सिनेमातही जाणवते. यावेळी ...

किरण देवहन्स interview सोमवार, १४ जुलै २००८, १५:३८ (+०५:३०)

कॅमेरामन से डायरेक्‍शन तक!
"कयामत से कयामत तक', "अक्‍स', "कभी खुशी कभी गम' आणि "जोधा अकबर' या परस्परभिन्न चित्रपटांचे छायादिग्दर्शक ही किरण देवहन्स यांची एक ठळक ओळख. जाहिरात क्षेत्रामध्ये गेल्या 20 वर्षांमध्ये केलेली कामगिरी ही त्यांची दुसरी ठळक ओळख. त्यांच्या नावावर सध्या हजारहून अधिक जाहिराती जमा आहेत. चित्रपट तसेच जाहिरात क्षेत्रामधील करियरबद्दल त्यांच्याशी केलेली चर्चा.

हरमन बावेजा - interview शुक्रवार, ०४ जुलै २००८, २१:३० (+०५:३०)

दिग्गजांच्या अपेक्षांना न्याय दिला पाहिजे...

इंट्रो...
"दिलवाले', "दिलजले', "कयामत' यांसारख्या यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शक हॅरी बावेजा यांचा मुलगा, ही हरमन बावेजाची खरी ओळख. हृतिक रोशनसारखं दिसणं, ही त्याची दुसरी ओळख. मात्र, "लव्हस्टोरी 2050' हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर यांच्यासारखे दिग्गज दिग्दर्शक त्याच्यावर फिदा झालेत. आपल्या ...

इम्रान खान interview गुरुवार, ०३ जुलै २००८, १८:४९ (+०५:३०)

अभिनेता आमीर खानचा भाचा या एका ओळखीमुळं इम्रानबद्दल अनेकांना मोठ्या आशा आहेत. आमीरची चुलत बहीण नुझत खान यांचा तो मुलगा आहे. "जाने तू या जाने ना' प्रदर्शित होण्यापूर्वीच इम्रानला आणखी दोन सिनेमे मिळाले आहेत. चित्रपट माध्यमाबद्दलची आपली मतं, आमीर आणि आपल्या करियरबद्दलची त्याची ही निरीक्षणं.
-------------
ः "जाने तू...'मध्ये जयसिंग राठोड असं नाव असलेल्या तरुणाचा "रोल' मी साकारतोय. ...

थोडा प्यार थोडा मॅजिक-review सोमवार, ३० जून २००८, १६:३७ (+०५:३०)

सगळ्याच आघाड्यांवर थोडा...
चांगला सिनेमा बनायला केवळ "हट के' विषय असून चालत नाही. तो विषय दीड-दोन तासांमध्ये पुरावा आणि मुरावाही लागतो. तसं न झालं तर ते बूमरॅंग ठरण्याची भीती असते. कुणाल कोहली दिग्दर्शित "थोडा प्यार थोडा मॅजिक'बद्दल नेमका हाच घोळ झालाय. "हम तुम', "फना' या दोन सिनेमांचं दणदणीत यश पाठीशी असताना कुणालनं प्रेक्षकांना "इमोशनल डोस' देण्याचं धाडस दाखवलंय. मात्र दुर्दैवानं ...

कुणाल कोहली "दिल से' गुरुवार, २६ जून २००८, १९:४४ (+०५:३०)

"थोडा प्यार थोडा मॅजिक' हा चित्रपट म्हणजे दिग्दर्शक कुणाल कोहलीसाठी दुहेरी दडपण आहे. पहिलं दडपण म्हणजे या सिनेमाचे सहनिर्माते "यशराज फिल्म्स'च्या वाट्याला सातत्यानं आलेलं अपयश आणि दुसरं दडपण म्हणजे कुणालचे लागोपाठ हीट ठरलेले दोन चित्रपट. या दोन दडपणांच्या पार्श्‍वभूमीवर हा सिनेमा उद्यापासून (ता.27) प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्तानं कुणाल कोहली म्हणतोय, "मैं कॅल्क्‍युलेटरसे ...

सनई चौघडे - review सोमवार, २३ जून २००८, १४:३३ (+०५:३०)

हा खरा धक्का!
मराठी सिनेमांमधले वेगवेगळे विषय आणि त्याचा "लूक' हा गेल्या काही वर्षांमधला चर्चेचा विषय आहे. तरीदेखील भाषेच्या दृष्टीनं आपला सिनेमा अजूनपर्यंत पुस्तकी भाषेतच अडकला होता. आजच्या तरुणाईच्या भाषेची नस त्याला काही केल्या सापडत नव्हती. हे अवघड काम साध्य करण्यात निर्माते श्रेयस-दीप्ती तळपदे आणि दिग्दर्शक राजीव पाटील यांना यश आलंय. या सिनेमातली काही दृश्‍यं ...