कुठे राहते शिल्लक
काही काळाच्या ओघातं
तुटे पतंगाची दोरी
जाते अस्तित्वं उडतं....
कुठे राहते शिल्लक
काही काळाच्या ओघातं
तुटे पतंगाची दोरी
जाते अस्तित्वं उडतं....
एकलेपणात
मन गाई गाणे
कुणाचेच नाही
मज घेणे देणे.
तरी पुन्हा पुन्हा
घेरते निराशा
कुणी तरी यावे
मन करी आशा.
एकलेपणात
थांबू पाही श्वास
जितेपणी होतो
मरणाचा भास.
रित्या घागरीत
घोंघावतो वारा
उदास ...
पुन्हा आभाळ दाटले
तिच्या गहिर्या डोळ्यात;
पुन्हा बरसल्या धारा
तिच्या सुन्या काळजात...!
ओळखीच्या पावसाने
तिला वाटेत गाठले,
चिंब भिजवून माती
पुन्हा मिठीत घेतले....
आल्या पावली पाऊस
पुन्हा फिरला ...
डोळ्यांमध्ये जमू लागली
पुन्हा तीच विराणी,
गहिवरलेली एक आठवण
अन् थोडेसे पाणी.
पुन्हा ...
तुया हातच्या चुड्याची मले सदाई नवाई
टिचरली एक जरी, माह्या जिवाले जिवाई.
तुवं लाजून हासनं मले सदाई हरिकं,
तुया हासन्यात दिसे चांदन्याची झलकं...
तुया लाजन्यानं भेटे जगन्याची वं दवाई....
गोऱ् यागोमट्या रूपाले ...
कुणास कळते ह्रदयाची कळ
अपुले आपण असतो केवळ
असे कसे हे अपुले नाते...
मला घाव अन् तुला कसे वळ?
कुठून आणु ऊसणे मागुन
पुन्हा पुन्हा मी जगण्याचे बळ...
कितीक द्यावी स्पष्टीकरणे...
कितीक आपण काढावा पळ ?