देवनागरी
Roman
Press F12 to toggle

खरा पाऊस,चित्रातला पाऊस आणि कोरडा पाऊस {poem}

खरा पाऊस,चित्रातला पाऊस आणि कोरडा पाऊस

"येरे येरे पावसा तुला देतो पैसा" हे बडबडगीत लहानपणी आपण खुपदा गायले असेल .कधी पाऊसाला आळवणी करण्याकरता ,
तर कधी चिंब भिजल्यावरही अजून बरसन्याकरता ...कशी गंमत येते ना
आज तू अनुभवतोय पाऊस ,आणि मी मात्र आठवणीत रमतेय.खूप वर्ष झालीयेत ,
पाऊस भेटला नाही. तुला रोज भेटतो ना,मग मला सांग ना ,त्याच्या करामती .
मला आठवतेय त्याचे ,कधी जोरात बरसन ,तर कधी थोडस बरसून ढगाआड लपून बसनं.
कधी अचानक बरसून चिंब भिजवण ,तर कधी छत्रीत असल्यावर त्याच वाकुल्या दाखवनं.
अनुभवतेय फक्त चित्रातला पाऊस ...आणि काय...रखरखीत वाळवंटात राहतेय ना ....
मला वाटतेय पाऊस माझ्यावर रुसलाय .म्हणून असा लांब जाऊन लपलाय ...
मी माझ्यासोबत थोडासा पाऊस आणला होता ..पण आत्ताशा तो कोरडा झालाय.
मला पाऊस व्हायचय .....रानोमाळ भटकायचय ...मनाला वाटेल तिकडे बरसायचय..
ढगातुन थेंबाच्या सोबत बरसायचय ......आसमंतात वा-यासारख झाडांनाही सतवायचय .
स्वप्नांच्या देशात भटकायचय ...भावनेच्या पंखात बळ घेऊन
पुन्हा मायदेशी परतायचय....चिखलातल्या कमळाला फुलवायचय
सुकलेल्या फुलांना जगवायचय...माती रुक्ष असली तरी
मातीतल्या माणसांसाठी जगायचय..........एक स्वप्न उराशी बाळगायचय
काहि वेगळ करता नाही आलं तरी ..माणसातल्या माणूसकीला मात्र जपायचय
मनिषा बांगर -बेळगे,दुबई

मनिषा

मनिषा बांगर -बेळगे