देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कम्फर्ट फ़ूड

कांदे पोहे (Kande Pohe) शुक्रवार, ०४ जुलै २००८, ०९:५६ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

१ मध्यम कांदा बारीक चिरुन
२ वाट्या मध्यम जाडीचे पोहे
२-३ हिरव्या मिरच्या चिरुन
१/२ टीस्पून खिसलेले आले
४-५ कढीपत्त्याची ...

पालकाची पळीवाढी भाजी (Spinach BhaajI) बुधवार, ०२ जुलै २००८, ०५:०१ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

पालकाची पातळ भाजी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करतो. ही रेसीपी माझी मैत्रीण रेणुका हिची आहे.

Spinach BhaajI

१ मोठी जुडी पालक
१ ...

साबुदाणा खिचडी (Sabudana Khichadi) गुरुवार, १९ जून २००८, ०१:१५ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

साबुदाणा खिचडी ब-याच लोकाना प्रिय असते. मला मात्र त्याचे खूप कौतुक नव्हते. एकतर घरात रोजचा उपास कधी कोणाचा नसे आणि सगळ्यांच्या ...

मोडाच्या मसुरांची आमटी (Sprouted Lentil Amati) सोमवार, १२ मे २००८, १२:१० (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

बेळगावला मंगळवारी दुकाने बंद असतात आणि त्यादिवशी काका लोक घरी असत. मग रात्रीच्या जेवणाला नेहमीच्या भाजी भाकरी भात यापेक्षा काहीतरी वेगळे करायची टूम निघायची. अशावेळी मग ही मसूर आमटी म्हणजेच चन्नंगी सारू आणि ब्रेड असा फंडु मेनु असायचा. तेच हे चन्नंगी सारु -

Sprouted Lentil Amati

२ कप मोड आलेले मसूर
१ टेबलस्पून आले लसुण पेस्ट
१ टेबलस्पून गोडा मसाला
मीठ, लाल तिखट चवीप्रमाणे
२ ...

दही बुत्ती (Curd Rice) सोमवार, १२ मे २००८, १२:०५ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

मी लहान असताना आमचे कराड-कोल्हापूर-पुणे असे सारखे जाणे होत असे. त्याकाळात आजच्यासारखी चांगली हॉटेल्स वगैरे नसल्याने आणि प्रत्येकवेळी हॉटेलमधे जाणे शक्य नसल्याने मग जाताना चपात्या, बटाट्याची काचर्याची भाजी आणि दही बुत्ती हा डबा आज्जी, मम्मी नेहेमी करुन नेत. सोबत एका बाटलीमधे थोड्या दुधाला ताजे विरजण लावून आणि एका थर्मासमधे दूध. त्यामुळे गेल्या गेल्या दूध दही आणायला बाजारात ...

पौष्टीक खिचडी (Healthy Khichadi) शनिवार, १० मे २००८, ०१:१९ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

बरेचदा असे होते की स्वयंपाकाचा तुफान कंटाळा येतो आणि तेच तेच इडली, डोसा, छोले नान असले बाहेर जाऊन खायचा तर त्याहुनही कंटाळा येतो. चिनी, थाई वगैरे दुकानात भात, नारळाचे दूध खायची भिती वाटते. अशावेळी दोघांपैकी कोणीतरी वरणफळे किंवा खिचडी कढी बनवतो. मधे केलेल्या पौष्टीक खिचडीची कृती देतेय.

Healthy Khichadi

१ भाग सालीची मूगडाळ
१ भाग ताजे/ फ्रोझन सोयाबीनचे दाणे
२ भाग ब्राऊन भात ...

दाणे लावून हिरव्या टोमॅटोची भाजी शुक्रवार, ०४ एप्रिल २००८, ०६:३६ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

मला आणि माझ्या मैत्रीणीला माझ्या (त्यावेळच्या) होणा-या नवा-याने जेवायला बोलावले होते. त्याच्या स्वयंपाक कौशल्याबद्दल मला फार शंका नव्हती पण तिला होती. त्यामुळे घरून जाताना ती नीट चिवडा लाडू वगैरे खाउन निघाली. त्याने आमच्यासाठी दहीभात, ही भाजी, विकतच्या पोळ्या, पापडाचा खुळा, आणि बरेच काय काय केले होते. तिला बघुनच धक्का बसला! अशी झाली माझी आणि या भाजीची ओळख. पुढे लग्न झाल्यावर ...

लाल टोमॅटोची भाजी गुरुवार, २७ मार्च २००८, ११:०८ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

सकाळची भाजी कमी पडणार असेल किंवा पप्पांपुरती असेल तर मग मम्मी आमच्यासाठी ही भाजी करायची. पप्पांना टोमॅटोच्या भाजीत अज्जिबात इंटरेस्ट नसायचा त्यामुळे तेही खूश आणि मला आणि सुबोधला खुप आवडायची म्हणुन आम्ही खूश! पण एक मात्र खरे, ही भाजी मुद्दाम ठरवून केली की अजिबात ती चव येत नाही. पट्कन काहीतरी हवे म्हणुन २ टोमॅटो चिरावेत एखादा पाकळी लसुण ठेचावा आणि करावी तिच चव खरी!

२ मोठे ...

दह्यातला साबुदाणा मंगळवार, २५ मार्च २००८, २३:३९ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

Tapioca Yogurt
आमच्याकडे घरी कोणाचे रोजचे उपवास कधीच नव्हते. श्रावण सोमवार, अंगारकी, आषाढी, कार्तिकी, महाशिवरात्र हे आमच्यकडे उपवासाचे दिवस. त्यामुळे साबुदाणा खिचडी फार कमी वेळा केली जायची. पण मला खिचडीचे का कोण जाणे फार कौतुक नव्हतेच. त्यापेक्षा मला साबुदाण्याची खीर, गोडाची खिचडी, दह्यातला साबुदाणा हे प्रकार जास्त आवडायचे. त्यातले एक एक प्रकार लिहुन ठेवेन म्हणतेय. आजच्या अंगारकी ...

इडली-चटणी-सांबार शुक्रवार, २१ मार्च २००८, ११:०२ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...


इडली -
इडली करण्यासाठी प्रत्येकाचे प्रमाण वेगळे असते. बासमती तांदुळ, उडीदडाळ भिजवून केलेल्या पिठाच्या इडल्या नेहेमीच चांगल्या लागतात. पण इथल्या थंडीत पिठ अंबणे थोडे कठीण जात असे म्हणुन मग एकदा इडली रवा आणुन करुन पाहीले. ते पण नीट झाले. त्याच वेळेला थंडीमधे पीठ कसे अंबवावे याची एक 'ट्रिक' पण कळली ती पण इथे देतेय.

३ वाट्या इडली रवा
१ वाटी उडीद डाळ

कृती - डाळ आणि रवा ...