माणसाच्या मुलभुत गरजांमधे तशा सर्वच गरजा धडपड करुनच प्राप्त होतात. अन्न वस्त्राची बरोबरी करण्या इतपत सक्षम होणार्या कित्येकांना घर उभे करण्यासाठी मात्र तपातूनच जावे लागते. उभ्या आयुष्यात कित्येकांचे हे स्वप्न साकार देखील ...
माणसाच्या मुलभुत गरजांमधे तशा सर्वच गरजा धडपड करुनच प्राप्त होतात. अन्न वस्त्राची बरोबरी करण्या इतपत सक्षम होणार्या कित्येकांना घर उभे करण्यासाठी मात्र तपातूनच जावे लागते. उभ्या आयुष्यात कित्येकांचे हे स्वप्न साकार देखील ...
असे म्हणतात प्रत्येक प्रसूती स्त्रीसाठी तिचा एक नविन जन्म असतो. आईला तिचा जन्मदिवस माहिती नाही, शाळेत तर ती गेलीच नाही तेंव्हा दाखलाही नाही. मुलांना वाटतं आईचाही वाढदिवस साजरा व्हावा. ह्यावर एक उपाय म्हणून, जो माझा तोच आईचाही ...
खूप काही उरल आहे
ती वाट मात्र मागे पडली;
पुढची नकोशी आहे
तिच पायाशी कशी आली?
रिक्त ओंजळ कमी पडावी
समोर इतकं वेचायचं आहे;
'ईदम न् मम' चा सुर
आतला मी घोकत आहे
चार पावलं मागे जातात
नवी आठ समोर पडतात
पुढे की मागे ...
चांदण्यांनी खच्चून भरलेलं आकाश
अन् अढळ धृवाची अलिप्तता...
पावलापावलागणिक माणसांची गर्दी
इथे तिथे.. अगदी चोहीकडे
त्यात एकटेपणानी वेढत जाणारी
एक अनामिक हुरहुरणारी भिती
अन् त्याहूनही पटीने अधिक
कुणाच्या तरी ...
जेंव्हा मला आपले एकटे राहणे अपरिहार्य आहे असे वाटले त्यावेळी मी घर बघायला सुरवात केली. होतो त्या घरात अगदी जीव गुदमरुन जात असे. शेवटी धुमसत धुमसत का होईना माझ्या मनानी घर शोधायचेच असा निर्णय घेतला. ह्यापुर्वी कधीच एकटे ...
तू कविता पाडलीस तेंव्हा
न राहवून मी ग्रेस खाली ठेवले
आरती प्रभुंना वंदन केले
अन् कविवर्य कुसुमाग्रज आठवले..
यथाशक्ती रसग्रहण करताना
रसस्वादाला दिशा मिळेना
आशयातील तोचतोचपणानी
करवादलेला जीव आवरेना..
समस्त ...
वसंत सरुन गेल्यावर
तरुची काया पालटते
एक एक पान झडताना
आठवण जुनी मोहरते
आठवणींचं हे झाड
खूप पोक्त झालं आहे
अन् गाणार्या पक्ष्याला
इथला वसंत अप्रिय आहे..
तरुतळी जमलेली पाने
पाचोळा होऊन करकरतात
निसटून ...
... ह्या शहरातील वसंत
उदास उदास आहे
बहरुन आहे, डवरुन आहे
गाभ्यात मात्र पोखरुन आहे
कोकीळेचा इथे कळिरव आहे
घनदाट झाडीत सुर आहे
आसमंत चौफ़ेर तल्लीन आहे
निरव क्षणी मात्र खंत आहे
मंगलधुन अशी पहाट आहे
सानगोजिरी ...
उन, मन आणि पान...
कोवळ्या उनाचे कवडसे
एक हिरवस पान
आणि अस्वस्थ मन
उनाचे सौम्य किरण
पानाची सळसळ
आणि मनाची तळमळ
उनाचे सोनेरी रूप
पानाचा पिवळा रंग
आणि मनाचे नैराश्य
उनाची वाढती रणरण
पानाची घनदाट छाया
१) विसाव्यासाठी ..
अलिकडे स्वप्न डसत नाही
सय सलत नाही,
जीव जडत नाही
की ऊर भरून येत नाही ..
समोर तटस्थ उभे आहे
पर्णहीन झालेले एक झाड
जे फ़ळत नाही, फ़ुलत नाही
बहरत नाही मी मोहरत नाही
हिरवळीच्या वाटेने जाताना