देवनागरी
Roman
Press F12 to toggle

काही क्षण ... काही आठवणी .. काही विचार

अनुदिनीकार/प्रेषक: Mints!
ब्लॉग पत्ता: http://majhyaathavani.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

बागेतला फेरफटका रविवार, २८ सप्टेंबर २००८, २३:३८ (+०५:३०)

शनिवारी रविवारी कधी नव्हे ते थोडा वेळ मिळाला बागेत चक्कर टाकायला. आमच्या रोझमेरीला आलेली फुले त्यावरच्या मधमाश्या, तुळशीच्या झाडाला आलेल्या मंजि-या, लॅव्हेंडरची जांभळी फुले, ...

हायकू शुक्रवार, १२ सप्टेंबर २००८, १०:४१ (+०५:३०)

कविता हा माझा प्रांत नोहे. पण परवा सुमेधाचा ब्लॉग आमच्या 'ह्यांना' दाखवत होते तिथे साखळी हायकुचे पोस्ट वाचले. त्याने त्याचवेळी थोडावेळ डोके चालवुन हे ...

मंगलमुर्ती मोरया! गुरुवार, ०४ सप्टेंबर २००८, ११:०६ (+०५:३०)

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ|
निर्विघ्नं कुरुमे देवं शुभकार्येशु सर्वदा||

Hand Painted Ganesh

मला गणापतीच्या मुर्ती, फोटो जमवायचे अतोनात वेड होते. सध्या काही दिवस ते थोडे थांबवले आहे. ही तीन चित्रे पुण्याच्या एका मुलाने काढलेली आहेत. मला आवडतात म्हणुन माझ्या एका मैत्रिणिने माझ्यासाठी आणली. कडेच्या फ्रेम मला हव्या असलेल्या रंगाच्या न मिळाल्यामुळे मी साध्या फ्रेम्स ...

आवडलेले थोडे काही ... गुरुवार, २८ ऑगस्ट २००८, ०२:५५ (+०५:३०)

संवेदचा कवितांचा खो एकदा धाडसाने(!) परतवुन लावला तर गिरीने दिलाच. माझे कवितांचे वाकडे अजिबात नाही. साध्या सोप्या कवीता कळतात देखील. पण कवितांची भीती का आणि कशी बसली माहिती नाही. तरी आवडलेल्या दोन(च) कवीता इथे देतेय. त्याआधी संवेदने लिहिलेले नियम परत डकवते इथे -

१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा

Why Raw? रविवार, ०८ जून २००८, २१:१० (+०५:३०)

मागच्या एका पोस्टमधे मी Raw Food खात होते असा उल्लेख होता. त्यावर ब-याच लोकानी प्रश्न विचारले होते. त्याला उत्तरे द्यायचा हा छोटासा प्रयत्न. ही मझी स्वत:ची मते आहे. तुम्हाला स्वत:वर यातले काहीही प्रयोग करायचे असल्यास स्वत:च्या जबाबदारीवर आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने करावेत. Mints याबाबतीत कशासही जबाबदार नाही.

मी David Wolfe या raw Foodist च्या सेमिनार ला गेले होते. त्याची यामागची भूमिका बरीचशी ...

रात्र थोडी आणि सोंगे फार ... मंगळवार, १५ एप्रिल २००८, ००:१७ (+०५:३०)

काल माझ्या एकुणच स्वभावाचा, रोजच्या दिनक्रमाचा कामाचा वगैरे आढावा घेत होते. आणि मुख्य जाणवलेली गोष्ट म्हणजे प्रत्येक नवीन दिसणार्या कामात रस घेणे हा मला असलेला अवगुण! हो अवगुणाच!

भरतकाम करायची आवड म्हणुन मग एक मोठे काम हातात घेतलेय ते आठवड्यातुन एकदा-दोनदा हातात घेउन बसते. वाचनाची आवड आहे म्हणुन मग एक इंग्लिश, एक मराठी अशी किमान २ पुस्तके माझ्या टेबलवर सापडतील. स्वयंपाकाची ...

रेशमाच्या रेघानी ... शुक्रवार, ०९ नोव्हेंबर २००७, २२:२४ (+०५:३०)

जे जे उत्तम ... शुक्रवार, ०५ ऑक्टोबर २००७, २०:४५ (+०५:३०)

नंदनने लिहायला चालु केले आणि आगावुपणाने लग्गेच सांगितले की टॅग का चालु करत नाही? मला अजीबात वाटले नव्हते की तो मनावर घेईल ;) पण तो नंदन आहे हे विसरले! आज स्वाती परत टॅग केले आणि अजुन ...

गणपती बप्पा मोरया! रविवार, २३ सप्टेंबर २००७, ०६:३४ (+०५:३०)

गणपतीची तयारी कशी चालु आहे? फुले, दुर्वा, मणीवस्त्र, फुलवाती, साध्या वाती, तेल, तुप, कापुर, निरांजन, आरतीचे पुस्तक (!), प्रसाद, हार सगळी तयारी झाली का? काय? मणीवस्त्र म्हणजे काय? कसे करायचे माहीती नाही. अरेच्चा एवढेच होय१ सोप्पे आहे की ...

आई मला शाळेत जाऊ दे ... सोमवार, १० सप्टेंबर २००७, ००:०९ (+०५:३०)

सध्या इथे नुकतेच शाळा/कॉलेजेस सुरु झाली आहेत किंवा होत आहेत. सगळ्या दुकानांमधुन Back To School सेल चालु आहेत. निरनिराळ्या प्रकारचे पेन, रंग, वह्या, दप्तरे पाहिले की मला माझी शाळा सुरु होतानाची लगबग आठवते. सगळ्यांनाच होत असेल.
मी जवळपास ...