देवनागरी
Roman
Press F12 to toggle

shraz-own

ब्लॉग शिर्षक: shraz-own
अनुदिनीकार/प्रेषक: Shraddha
ब्लॉग पत्ता: http://shraz-own.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

यंदाच्या मायबोली दिवाळी अंकातली माझी कथा बुधवार, ३१ डिसेंबर २००८, २२:४७ (+०५:३०)

'मध्यमवर्गातल्या त्याच त्याच पात्रांवर तेच तेच प्रसंग रचून सपक लिखाण करण्यात लेखकाचा हात कुणी धरू शकत नाही. यात बिचार्‍या लेखकाचाही दोष नाही. मध्यमवर्गापलिकडलं अफाट जग बिचार्‍याने कधी बघितलेलंच नाही. अशा झापडबंद लेखनात मग वाचकाला काय गवसणार?......'

नाही म्हटले तरी ती टीका मला बरीच झोंबली होती. मी माझ्या आयुष्यातल्या अनुभवांवर लिहित होतो. त्यात कुणाचे काय गेले? लेखकाला ...

हेमलकसा.... - चिन्मयचा लेख बुधवार, १६ जुलै २००८, १२:४० (+०५:३०)

बर्‍याच दिवसांनंतर ब्लॉग उघडूनही लिहिण्यासारखं माझ्याकडे काही नाही. पण हे पोस्ट कुणाच्यातरी प्रचंड कार्यामध्ये माझा खारीचा वाटा म्हणून!

वेळात वेळ काढून हा लेख जरुर वाचा. http://www.maayboli.com/node/2479

लेख आहे हेमलकसा आणि तिथे आमटे कुटुंबीय करत असलेल्या कार्याबद्दल.

हेमलकसाची इतर माहिती, ते कुठे आहे?, कशा प्रकारची परिस्थिती तिथे होती/आहे, तिथल्या आदिवासींपुढले प्रश्न ...

सती - ९ (शेवट) शनिवार, २४ मे २००८, १८:२३ (+०५:३०)

........ थोडीफार फळं, डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घेऊन शिशिर घरात शिरला. घरात सर्वत्र भयाण शांतता दाटलेली.... हिवाळ्यातला लहान झालेला दिवस मावळतीला लागलेला. सुधा औषधांच्या गुंगीत गाढ झोपली होती.
.... ' वाढ झालेली नाहीये बाळाची आणि.... ' पुढचं बोलणं त्याला कळलंच नाही.
दोन आठवड्यांपूर्वीची रात्रीची धावपळ त्याला आठवली. रात्री बाराला त्याने सुधाला हॉस्पिटलमध्ये हलवलं होतं. डॉक्टरांनी ...

सती - ८ शनिवार, २४ मे २००८, १८:१९ (+०५:३०)

१७ फ़ेब्रुवारी २००५.

आज मी खूप आनंदात आहे. आजचा समारंभ, त्यानंतरची पार्टी... आणि हो मिसेस कुलकर्ण्यांची भेट, सगळ्या चांगल्या गोष्टी एकदमच घडून आल्यायत.

दृष्ट लागण्यासारखं झालं अवॉर्ड फ़ंक्शन. काळ्या सुटातला शिशिर देखणा दिसत होता. अवॉर्ड मिळाल्याचा आनंद त्याच्या छोटेखानी भाषणातल्या शब्दाशब्दातून ओसंडत होता अगदी. त्याच्या सहकार्‍यांची काही भाषणं, त्याच्या ...

सती - ७ शनिवार, २४ मे २००८, १८:१२ (+०५:३०)

२१ जानेवारी २००४.

गेल्या बर्‍याच दिवसांत डायरीला हातही लावलेला नाहीय. शेवटची नोंद १३ ऑक्टोबर २००३ ची. शिशिरचा वाढदिवस. उसना उत्साह आणून तो दिवस साजरा केला. त्याच्या नि माझ्या आवडीचा स्वयंपाक केला खूप तास घालवून आणि डायनिंग टेबलवर बसल्या बसल्या माझ्या डोळ्यांतनं पाणी यायला लागलं,

' शिशिर... ' जेवण गेलंच नाही मग दोघांनाही. त्याच्या कुशीत शिरून मी रडत राहिले आणि तो काही ...

सती - ६ शुक्रवार, २३ मे २००८, ११:५४ (+०५:३०)

२ जून २००२.

आता जरा रूटीन मूळपदावर येतंय. टुणकीहून परतल्यावर त्या सगळ्या प्रवासाने प्रचंड थकायला झालेलं. तशात डोळ्यांसमोर तो एकाट वाडा दिसायचा. त्याच्या आसपासची ती नीरव शांतता, लांबूनच बघितलेलं ते रमेचं देऊळ.... आणि रमा आणि पार्वतीची कथा...
मी तिथे जाऊनही दर्शन घेतलं नाही रमेचं. आईंना वचन दिलं होतं खरंतर! मी केलं ते चूक की बरोबर? बाबांना फोन लावला.
' केलंस ते योग्यच ...

सती - ५ गुरुवार, २२ मे २००८, २३:५२ (+०५:३०)

१९ मे २००२.

जायचं ठरलं शेवटी. फार लांब नव्हतं. ' इथून जवळ डोंगरात एक वारी नावाचं ठिकाण आहे. त्याच रस्त्यावर अलिकडं इनामदारांचा पूर्वीचा वाडा आणि सतीच्या देवळाची जागा आहे. ' श्रीधर सांगत होता. त्याच्याच गाडीतून आम्ही निघालो. शिशिर श्रीधरशी गप्पा मारण्यात रंगला होता. श्रीधर उत्साहाने आजूबाजूला दिसणार्‍या शेतांबद्दल, पिकांबद्दल त्याला माहिती सांगत होता.

लौकरच ...

सती - ४ गुरुवार, २२ मे २००८, १४:०१ (+०५:३०)

१८ मे २००२.

' ....लहान होते, तेव्हा माझी आई सांगायची हो राघोजी इनामदारांच्या कथा... कसं त्यांनी एके वेळी एका वाघाला तलवारीच्या एका फटक्यात गारद केलं नि कसे ते पन्नास दरोडेखोरांशी केवळ दोन साथीदारांच्या सहाय्याने झुंजले. राघोजी इनामदार खरोखर मोठा कर्तृत्त्ववान माणूस. त्यांच्या वडिलांनी मिळवलेली इनामदारी त्यांनी अथक प्रयत्न करून राखली; वाढवली. त्याकाळी या भागातही ...

सती - ३ बुधवार, २१ मे २००८, २३:१४ (+०५:३०)

१७ मे २००२.

प्रवास पुढे चालू झाला. ड्रायव्हर त्याचं मौनव्रत सोडून शिशिरशी काहीबाही गप्पा मारत होता. माझ्या डोक्यातून मघाशी पडलेल्या स्वप्नाचा विचार काही जात नव्हता, म्हणून त्यांच्या बोलण्यात भाग घ्यावा असंही वाटेना. तशात उन्हाने डोकंही दुखायला लागलं होतं. मी टुणकी येण्याची वाट बघत बसून राहिले. एका टपरीवजा हॉटेलापाशी जीप थांबली. तिथंच चार रस्ते फुटत होते.

' आलं ...

सती - 2 बुधवार, २१ मे २००८, १०:२७ (+०५:३०)

१६ मे २००२.

१३ मेला नागपूर गाठलं आम्ही. तब्बल चार तास लेट झालेली फ़्लाईट. नागपूरला उन्हाळा मी म्हणत होता. तिथे शिशिरच्या आत्यांकडे उतरलो. विश्रांती, जेवण, थोड्याफार गप्पा... सकाळी तरी लौकरच जाग आली. कुठल्यातरी ट्रॅव्हल्सची बस, सीट्स अडचणीच्या! माझ्या कपाळावरची आठी पाहून शिशिर म्हणाला, ' अगं, थोड्याशा अंतराचा तर प्रवास आहे. चालवून घे आता. ' हा लगोलग टुणकीला जायचा हट्ट खरंतर ...