देवनागरी
Roman
Press F12 to toggle

(‘....तान्ह्या मुला’ ह्या संग्रहातून )

सवाष्ण रविवार, ०२ मार्च २००८, १६:५७ (+०५:३०)

डॉ.श्रीकृष्ण राऊत डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता

तलखी पिवळी झोंबत अंगा
काळवंडली कात सावळी;
अंकुरलेल्या चैतन्याने
तिच्यावरी ये झाक जांभळी.

मानेभवती पडल्या खाचा,
बाही उतरे खांद्याखाली;
लेकुरवाळ्या स्पर्शसुखाने
ताठर चोळी थैली झाली.

नाव शनिवार, १६ फेब्रुवारी २००८, २२:२५ (+०५:३०)

डॉ.श्रीकृष्ण राऊत डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता

सुचले तर सांगा
एखादे आधुनिक नाव
ह्या घरासाठी.

ज्याच्या समोर आहे
हिरव्या पाण्याचा स्विमिंग पूल
काळ्या म्हशींसाठी.

ताट्यांच्या कुंपणावर चढून
बकर्‍या खातात
अंगणातली फुलझाडं.

तोंडाला अजून शक्य झाला नाही
प्लॅस्टरचा मेकप.

दर्शनी भिंतीवर दिसतातना
वाळून काळपट झालेले

पूनम उर्फ राणी पाटील रविवार, १० फेब्रुवारी २००८, २२:०१ (+०५:३०)

डॉ.श्रीकृष्ण राऊत डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता

अहिंसेचं तत्त्वज्ञान
सार्‍या जगाला शिकविणार्‍या
महात्म्याच्या नावानं उघडलेल्या
महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात
झालेले चाकूचे वार
नव्हते तुझ्या गळ्यावर;
ते होते
स्त्रीत्त्वाच्या मंजुळ कंठातून
फुटणार्‍या ...

शहरा रविवार, ०३ फेब्रुवारी २००८, ११:३३ (+०५:३०)

डॉ.श्रीकृष्ण राऊत डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता

तुझ्या जमिनीवर पाय ठेवल्याबरोबर
माझी नजर अडकते
सिनेमांच्या पोस्टरवरील
नट्यांच्या उत्तान स्तनांवर.

नंतर मी जेव्हा हिंडून घेतो
झगमगीत बाजारपेठेतून
विंडोशॉपिंग करीत
तेव्हा क्रीम आणि सेंटच्या तीव्र ...