देवनागरी
Roman
Press F12 to toggle

( ‘....तान्ह्या मुला’ ह्या संग्रहातून)

भूल शुक्रवार, १८ जानेवारी २००८, २२:४९ (+०५:३०)

डॉ.श्रीकृष्ण राऊत डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता

तीन दगडांची चूल,
काडी-कचरा इंधन;
नालीशेजारी वाहत्या
झाडाखाली रंधावन.

ताट उपडे होऊन
झालो म्हणे पोळपाट;
वर आडवा गिल्लास
हळुहळू पोळ्या लाटं.

थंड परिसरामधे
रडे आकांताने मूल;
आत मालकाला दिली
पाय तोडणारी भूल.

भूमिका बुधवार, ०९ जानेवारी २००८, २२:२७ (+०५:३०)

डॉ.श्रीकृष्ण राऊत डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता

सकाळ चढत जाते
तशी कामं पळू लागतात
हातापुढे
नि पाय टाइल्सला लागतात
न लागता...

आवडी-निवडी,
शाळा-डबा,
हवे-नको
आणि चतकोरभर
उदरंभरणं...

एक हट्टी कण
अडून बसतो झडपेवर;
गटगट पाण्याला समजत नाही;
कणभर सरकत नाही;

तुको बादशाह सोमवार, २४ डिसेंबर २००७, २२:३५ (+०५:३०)

डॉ.श्रीकृष्ण राऊत डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता

मंबाजी,
तुमचे आभार मानावे
तेवढे थोडेच.

तुमच्या वाकड्या सहाणेने
लावली शब्दांना अभंग धार
नि
वीणेला दिला
तुमच्या तेढ्या खुंटीने आधार.
तुमच्या दगडी भिंतीशिवाय
एवढा उसळलाच नसता
‘त्रिगुणांचा चेंडू’.

डिसेंबर ब्याण्णवचे मर्ढेकर सोमवार, १७ डिसेंबर २००७, २२:०१ (+०५:३०)

डॉ.श्रीकृष्ण राऊत डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता

पायांखाली माती नाही,
अस्मानाशी तुटले नाते;
अधांतराची उलटी गंगा
पुन्हा एकदा गोते खाते.

देव्हार्‍यातिल वीज-निरांजन
अखंड तेवत ठेवी बंधू;
संगणकाच्या पडद्यामागे
मंत्रमुग्ध पण त्याचा मेंदू.

बुडास पक्क्या फुटे ...

जुलूस रविवार, ०९ डिसेंबर २००७, २१:५५ (+०५:३०)

डॉ.श्रीकृष्ण राऊत डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता

सवाष्णीच्या हातातला
दीप ल्याले वृंदावन;
हिर्व्या,बिलोरी वर्खाने
त्याचे लपेटले मन.

निखार्‍याच्या मिठीतली
झाली सुगंधित राळ;
समईच्या गळा आली
दीपकलिकांची माळ.

गुलाबाच्या खांद्यावर
जड निर्माल्याची मूस;

रांगोळी बुधवार, २८ नोव्हेंबर २००७, २०:४८ (+०५:३०)

डॉ.श्रीकृष्ण राऊत डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता

सड्यासाठी नाही शेण.
नसू दे.
शिंपडायला ओंजळभर पाणी
वाचवलं तुझ्या बायकोनं.
तेच खूप आहे.

तिला म्हणावं,
फार थेंब घालू नकोस.
त्यांना
परस्परांशी जोडताना
तीच जाते तुटत.

महाग झालेत.
होऊ दे.
पण
चिमूटभर