तुमच्या ब्लॉगर.कॉम वरील सदस्य खात्यात येण्याची नोंद केल्यानंतर ब्लॉगप्रकाशनाच्या पानावर ब्लॉगचे टेम्प्लेट (संरचना) असे शोधा:
१) टॅब: Layout
२) दुवा: Page Elements

ब्लॉगची संरचना दिसल्यानंतर तेथे तुम्हाला मराठी ब्लॉग विश्वाचे चिन्हा ज्या रकान्यात ठेवायचे आहे तेथे
३) "Add a Page Element" ह्या दुव्यावर टिचकी द्या.
यानंतर पुष्कळ पर्याय असलेले पान तुम्हाला खाली दाखविलेल्या चित्राप्रमाणे दिसावयास हवे. त्या पानामध्ये "HTML/JavaScript" हा पर्याय शोधा व त्याखालील
४) "ADD TO BLOG" ही कळ दाबा.

पुढे दिसणाऱ्या "Configure HTML/JavaScript" ह्या रकान्यामध्ये तुम्हांस मिळालेला "मराठी ब्लॉग विश्वा"चा विजेट कोड चिकटवा.
५) "SAVE" ही कळ दाबून तुम्ही केलेले बदल संरक्षित करा.
आता "Preview" ही कळ दाबल्यावर तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर मराठी ब्लॉग विश्वाचे चिन्ह दिसू लागेल.