संकेतस्थळांवर मराठीत लिहिण्यासाठी बरेच कार्यक्रम उपलब्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे फोनेटिक टायपिंग वापरून इंग्रजी कीबोर्डनेच मराठीतून लिहिणे.
- मराठी ब्लॉग विश्व संकेतस्थळ
-
या संकेतस्थळावरील वर उजव्या बाजूला दिसणार्या लहानशा ब्लॉकमध्ये F12 ही कळ दाबली असता त्यावरील बिंदू कळ (radio button) "देवनागरी" ह्या पर्यायावर जाईल. त्यानंतर ह्या संकेतस्ळावर कुठेही तुम्ही फोनेटिक टायपिंग करू शकता. उदाहराणार्थ इंग्रजी कळपटलावर लिहिलेले "m" "a" "r" "a" "a" "T" "h" "I" हे थेट "मराठी" असे देवनागरी युनिकोड मध्ये लिहिल्या जाईल.
सध्या या संकेतस्थळावरील मराठीमध्ये लिहिण्याची व्यवस्था अपुरी आहे. जर काही कारणास्तव एखादा शब्द लिहिणे जमले नाही तर कृपया खालील एखाद्या पर्यायांपैकी कार्यक्रम निवडावे.
- ब्लॉगर.कॉम
- ब्लॉगर.कॉम वर मराठीमध्ये लिहिण्याकरिता हिंदी Transliteration ची सोय उपलब्ध आहे. त्याबद्दल अधिक माहिती येथे मिळेल: http://help.blogger.com/bin/answer.py?answer=58226
- बराहा
- पण तुम्हाला जर इतर संकेतस्थळावर मराठी देवनागरीतून लिहायचे असेल तर त्यासाठी बराहाचे IndicIME हे सॉफ्टवेअर वापरता येईल.
- गमभन
-
गमभन ह्या संकेतस्थळावर जाऊन "Clear Editor" ही उजव्या बाजूला वर असलेली कळ दाबून तेथील संपादनक्षेत्रामध्ये तुम्हाला स्वतःचे मराठी लेखन करता येईल. ते लेखन तेथून उतरवून तुम्हाला कुठल्याही संकेतस्थळामध्ये असलेल्या रकान्यामध्ये चिकटवता येईल.
- क्विलपॅड
-
क्विलपॅड (Quillpad) हे संकेतस्थळ गमभन प्रमाणेच मराठी लिहिण्याकरिता उपयुक्त संकेतस्थळ आहे. ते लेखन तेथून उतरवून तुम्हाला कुठल्याही संकेतस्थळामध्ये असलेल्या रकान्यामध्ये चिकटवता येईल.
- मायक्रोसॉफ्ट ऑफिस २००३ लिप
-
मायक्रोसॉफ्ट ऑफिस २००३ लिप ही आणखी एक मराठी लिहिण्याची पद्धत आहे. मायक्रोसॉफ्टच्या भाषाइंडिया ह्या संकेतस्थळावर ह्याबद्दल माहिती उपलब्ध आहे.
- लिनक्स
-
लिनक्स कार्यप्रणालीमध्ये देवनागरी कसे लिहावे याबद्दल माहिती http://indlinux.org/ येथे उपलब्ध आहे.
- युनिकोडातून मराठी (pdf)
- आशिष आल्मेडा आणि सुशान्त देवळेकर यांनी मराठी युनिकोड समजावून सांगण्यासाठी एक छान लेख लिहिला आहे: संगणकावर मराठीतून व्यवहार : युनिकोडाच्या साहाय्याने. मराठी युनिकोड समजून घेण्याकरिता तो लेख वाचावा.