देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी ब्लॉग विश्व २.० बीटा?

नमस्कार,

मोठ्या उत्साहाने मराठी ब्लॉग विश्वाच्या नवीन आवृत्ती वर आम्ही आपले स्वागत करतो. जुन्या संकेतस्थळावरील पुष्कळ तांत्रिक अडचणी व बिघाड यांवर मात करून नव्या संकेतस्थळावर नियमितपणे कार्यक्षमता आणि सुखदकारी सदस्य अनुभव वाढविण्याचा उद्देश्य संकेतस्थळाच्या ह्या नव्या आवृत्तीमुळे साध्य होईल. सुरुवातीला तुम्हांस या नवीन आवृत्तीवर काही माहिती द्यावी यासाठी हे पान.

२.० बीटा म्हणजे काय?
वेब टू डॉट ओ (Web 2.0) च्या धरतीवर मराठी ब्लॉग विश्वाच्या नवीन आवृत्तीला आम्ही २.० असे आवृत्तीवजा नाव दिले आहे. २.० म्हणजेच पूर्वीपेक्षा अधिक उत्तम आणि कार्यक्षम. तसेच, बीटा हा शब्द एखाद्या कार्यक्रमासाठी तेव्हा वापरला जातो जेव्हा त्या कार्यक्रमाचा तपासणी काळ सुरू असतो. म्हणजेच कार्यक्रम अपेक्षेप्रमाणे काम करायला लागलंय, पण त्याची पूर्ण चाचणी झाली नाही आणि त्यामुळे नव्या अडचणी निर्माण होऊ शकतात. सध्या २.० आवृत्तीचा तपासणी काळ सुरू आहे आणि म्हणूनच २.० बीटा!

नवीन काय आहे?
नव्या मराठी ब्लॉग विश्वावर आता अस्तित्वात असणार्‍या नवीन ठळक गोष्टींपैकी :

  • मराठी ब्लॉगांमध्ये प्रसिद्ध झालेल्या सगळ्या नोंदींची फीड (R.S.S Feed) या एका संकेतस्थळावरून मिळविण्याची क्षमता.
  • मराठी ब्लॉगकर्त्यांसाठी चर्चासत्रे. येथे असलेल्या चर्चासत्रांमध्ये भाग घेऊन सदस्य मराठी ब्लॉग (अनुदिनी) विषयक प्रश्ने विचारू शकता आणि त्यावर चर्चा करू शकतात.
  • थेट संकेतस्थळावरच मराठी देवनागरी टंकलेखन करणे (ह्यावर सध्या कार्य सुरू आहे).
  • आंतरजालावरील समस्त मराठी ब्लॉग आणि त्यांच्यामध्ये प्रसिद्ध झलेल्या नोंदींच्या वर्गीकरणाबद्दल माहिती याच एका ठिकाणी मिळविणे,
  • आणि इतर बरेच काही.

लवकरच येत आहे!
तुम्हाला आम्ही विचारले की कोणत्या सुधारणा हव्यात आणि तुम्ही खरच उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात. त्यामध्ये सुचवल्याप्रमाणे कित्येक सुधारणा आम्ही या संकेतस्थळावर करणार आहोत. त्यामध्ये:

  • वर्णाक्षराने मराठी ब्लॉग शोधणे
  • सदस्यांनी स्वतः वेगवेगळ्या ब्लॉगांच्या याद्या त्या त्या विषयांनुसार तयार करून इतर सदस्यांसोबत वाटून घेण्याची क्षमता
  • गद्य/पद्य गाळणी
  • ब्लॉगांच्या याद्या त्यांच्या स्वतःच्या पानावर बघायला मिळण्याची क्षमता (आता फक्त पहिल्या पानावरच श्रुंखलेमध्येच ब्लॉग दिसतात)
  • आणि इतर बरेच काही.

काय अपेक्षा ठेवाव्यात?
नव्याने उभारलेल्या ह्या संकेतस्थळावरील कार्य अजूनही सुरू आहे. त्यामुळे अधूनमधून सेवा खंडित अथवा संथ होऊ शकते - त्याबद्दल दिलगीर आहोत. परंतू मोजक्या आणि सीमित तांत्रिक सहाय्यामुळे संकेतस्थळाची आवश्यक चाचणी करण्याकरिता सुरुवातीचा काही काळ ह्या अडचणींना तोंड देणे जरूरीचे आहे. म्हणूनच तुम्हाला कुठली तांत्रिक अडचण आली असता मराठी ब्लॉग विश्वाच्या चर्चासत्रांमधून ती अडचण आम्हाला पाठवा. तुम्ही सांगितलेल्या तांत्रिक उणीवा ह्या शक्यतो तितक्या लवकर दूर केल्या जातील. काही अडचणी आम्हाला माहितसुद्धा नसतील. त्यामुळे त्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत.

येत्या काही आठवड्यांमध्ये आणखी नवीन कार्यक्षमता उपलब्ध होईल. तोपर्यंत (आणि त्यानंतरही) तुम्हाला कुठल्या प्रकारे हे संकेतस्थळ वापरायला आवडेल ते आम्हाला नक्की कळवा.

आपले,
मराठी ब्लॉग विश्व व्यवस्थापन.

प्रतिक्रिया

सुखद बदल

बीटा व्हर्जन मध्ये केलेले बदल डोळ्यांना सुखद आणि उपयोगी आहेत. प्रयत्नांबद्दल धन्यवाद! नवीन फ़ीचर्स ची वाट पहातो आहोत.

अभिनंदन

संकेतस्थळाचे नवे रूपडे आवडले. आता पहिल्यापेक्षा हे संकेतस्थळ जास्त सुटसुटीत झाले आहे. तरीही सुधारणांना वाव आहे.

sabooree kaa phal achaa hota hai

it is user friendly
congrats to your software team
more suggestions in charchaa
samant

new member

i liked this site.wish my all best wishes to this site

new member

i liked this site.wish my all best wishes to this site

new member

i liked this site.wish my all best wishes to this site

new member

i liked this site.wish my all best wishes to this site

kahi adachani

majhya sarakya navin members na marathi type kartana far adchan yete.
tyache mukhya karan mhanaje marathi kahi shabda limitation mule type karata yet nahi asha veli mag english cha vapar karava lagto.
Maze ek suggestion aahe te mhanaje barah software kinva orkut ne devnagari bhashet kelele software kharach far user friendly aani beginners sathi uttam aahe tari tumachya software madhe aavashyak te badal karavet Aaani ajun ek gosht mhanaje kahi mukhya goshtinsathi english alternative mhanun thevave karan hi ek garaj aahe.

देवनागरी - Roman

F12 ही कळ दाबून देवनागरी किंवा Roman लिपीमध्ये लिहिण्याकरिता बदल करता येवू शकतो. सध्या ह्या संकेतस्थळावर प्रस्थापित देवनागरी लिहिण्याकरिता वापरलेल्या script मध्ये काही त्रुटी आहेत याची आम्हाला कल्पना आहे. त्या लवकरात लवकर दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- सहाय्यक.